ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

इस्माईली खोजा समाजाचे आगाखान (५) यांच्या ५५ व्या वाढदिवासा निमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

On: October 13, 2026 7:05 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागातून सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम


✍️पांढरकवडा : अशफाक खान


इस्माईली खोजा समाजाचे आगाखान (५) यांच्या ५५व्या वाढ दिवसानिमित्त समाजाच्या वतीने पांढरकवडा शहरात दि. 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संदेश देत समाजातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला.

वाढ दिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. त्यानुसार सकाळच्या सुमारास समाजातील सदस्य एकत्र आले आणि परिसरात विविध रोपांची लागवड केली. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.

या कार्यक्रमाला समाजाचे मुखिया नूरुद्दीन गिलानी तसेच इद्रिस जिवानी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, महीला,ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरणाचे वाढते महत्त्व, वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि भविष्यात अधिकाधिक वृक्षलागवड करण्याची गरज याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.

“एक झाड म्हणजे भविष्यासाठीची एक आशा” या भावनेतून समाजातील सदस्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. वाढ दिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे समाजाच्या सामाजिक कार्याला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील सदस्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी समाजाची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी जपण्याचा संदेश देत उपक्रमाची सांगता केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment