ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई

On: October 15, 2026 4:32 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ ४७ गोवंश जनावरांची सुटका; १९.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूरमार्गे हैदराबादकडे सुरू होती वाहतूक

✍️पांढरकवडा : अशफाक खान


नागपूरमार्गे हैदराबादकडे कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर धडक कारवाई करत ४७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत गोवंश, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्य रात्री 2.30 वाजता दरम्यान ग्राम कोंघारा परिसरात करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीनुसार, आयशर कंपनीचा कंटेनर क्रमांक UP-14-HT-9157 या वाहनातून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. माहितीची खातरजमा केल्यानंतर पांढरकवडा पोलिसांच्या पथकाने पंचांसह ग्राम कोंघारा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नाकाबंदी करून संशयित कंटेनरची तपासणी केली.

तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये एकूण ४७ गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि इजा होईल अशा पद्धतीने बांधून कोंबण्यात आल्याचे आढळून आले. जनावरांना आवश्यक मोकळी जागा, सुरक्षित वाहतूक तसेच योग्य सुविधा नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कोणताही वैध परवाना नसताना ही जनावरे वाहतूक केली जात असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले.

🎯 १९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी ४७ गोवंश जनावरे, अंदाजे किंमत ७ लाख ७० हजार रुपये, तसेच गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कथिया रंगाचा आयशर कंपनीचा कंटेनर क्रमांक UP-14-HT-9157, किंमत अंदाजे १२ लाख रुपये, आणि आरोपीचा मोबाईल फोन, किंमत ५ हजार रुपये, असा एकूण १९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि आरोपी वाहन चालक शेख अयुब शेख भुरू वय 45 वर्ष रा. नागपुर याला ताब्यात घेतले.

गोवंशाची अवैध वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील सुधारित कायदा १९९५ अंतर्गत कलम ५, ५(अ), ५(ब) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड), (इ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यवतमाळ तसेच पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेशकुमार गाठे, यवतमाळ तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभार पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस हवालदार रवि सिंहे, पोलीस हवालदार इमरान खान आणि पोलीस हवालदार रजनिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. दोन पंचांच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करून गोवंश व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment