ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मुख्याध्यापक गजाननराव गेडाम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

On: November 1, 2026 5:37 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा; आज दुपारी १ वाजता पांढरकवडा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार

✍️पांढरकवडा : सफी खान


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, घोंसी (पंचायत समिती पांढरकवडा) येथील मुख्याध्यापक गजाननराव गेडाम (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने शैक्षणिक वर्तुळासह पांढरकवडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गजाननराव गेडाम यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

गजाननराव गेडाम यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच शाळेच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या अचानक जाण्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिचितांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गजाननराव गेडाम हे पांढरकवडा येथील युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांचे चुलत सासरे होत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गजाननराव गेडाम यांची अंत्ययात्रा आज रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या चिंतामणी लेआऊट, पांढरकवडा येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यानंतर पांढरकवडा येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment