ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा शहरात पाणीटंचाई: पिंपरी बंधाऱ्याचे पाणी पिण्यासाठी राखीव – अवैध उपसा करणाऱ्याची मोटर जप्त

On: November 3, 2026 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा – सफी खान


पांढरकवडा शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शासनाच्या निर्देशानुसार धरणांमधील व बंधाऱ्यांमधील पाणी केवळ बिगर सिंचन (पिण्याच्या) वापराकरिता राखीव ठेवण्यात आले आहे.

पांढरकवडा शहराचा पाणीपुरवठा पिंपरी येथील बंधाऱ्यावरून होत असून सदर बंधाऱ्यामधील पाणी कोणीही उपसा करू नये, कोणत्याही शेतकऱ्याने मोटर टाकू नये, याकरिता नगर परिषद पांढरकवडा मार्फत यापूर्वीच शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या.

परंतु सदर नोटीसची पायमल्ली करून मौजा सायखेडा, पिंपरी रोड येथील बंधाऱ्यावर एका शेतकऱ्याने बंधाऱ्यात मोटर पंप टाकून अवैधरित्या पाणी उपसा सुरू केल्याचे निदर्शनास आले.

याची माहिती मिळताच नगर परिषद पांढरकवडा च्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी कल्याणी सोळंके, मोहन उयलवार, हंसराज चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मुख्याधिकारी श्री पंकज गावंडे यांचे आदेशानुसार सदर मोटर पंप जप्त करण्याची कारवाई केली. जप्त केलेली मोटर नगर परिषद कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

नगर परिषदेचे आवाहन:
या कारवाईनंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, पिंपरी बंधाऱ्यातील पाणी हे केवळ पांढरकवडा शहरातील नागरिकांना पिण्याकरिता राखीव असून कोणीही बंधाऱ्यात मोटर पंप टाकू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment