✍️वणी प्रतिनिधी :
वणी नगर पालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून राजकीय घडामोडी, सभा, निवडणूक कार्यालयांचे शुभारंभ या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ने गुरुवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जुन्या स्टेट बँकजवळील परिसरात आपले निवडणूक कार्यालय भव्यदिव्य वातावरणात सुरु केले. या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, युवक, महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, आणि जय भवानी–जय शिवाजीचा गजराचा नाद करत झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
🎯 उपस्थित मान्यवरांचा भव्य जमाव
कार्यक्रमास पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक म्हणून विनोद मोहितकर, प्रसाद ठाकरे, उमेश वैरागडे, राजू देवडे, हिमांशू बोहरा यांच्यासह विविध विभाग प्रमुख, पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

🎯 विजय चोरडिया यांचा विजयाचा कानमंत्र
उद्घाटन समारंभात विजय चोरडिया यांनी सर्व उमेदवारांना उत्साह, एकजूट आणि प्रबळ जनसंपर्क यांचे महत्त्व अधोरेखित करत खास ‘विजयाचा कानमंत्र’ दिला.
त्यांनी यावेळी म्हटले की—
“शिवसेना ही जनतेच्या मनात रुजलेली ताकद आहे. विकास, पारदर्शक कारभार व नागरिकांचा विश्वास हेच आमचे मुख्य शस्त्र आहे. सर्व उमेदवारांनी घराघरात जाऊन जनतेचा विश्वास संपादन करावा.”
त्यांच्या प्रेरणादायी भाषणानंतर जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
🎯 उमेदवारांमध्ये नवचैतन्य
उद्घाटनानंतर सर्व नगरसेवक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आणि स्थिर नेतृत्वाचे आश्वासन दिले.
🎯 निवडणूक कार्यालय झाले केंद्रस्थान
जुन्या स्टेट बँक रोडवरील हे नवीन कार्यालय आगामी निवडणूक काळात पक्षाच्या प्रचाराचे केंद्रस्थान ठरणार असून
🔺बैठका
🔺जनसंपर्क मोहिमा
🔺युवक व महिला आघाडीचे मार्गदर्शन
🔺निवडणूक रणनीती
या सर्वांचा समन्वय इथूनच करण्यात येणार आहे.
🎯 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्घाटन कार्यक्रमादरम्यान नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रचाराचे सूर आता तीव्र झाले असून वणीतील निवडणूक वातावरण आणखी रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.










