✍️पांढरकवडा : अशफाक खान
पोलीस स्टेशन पांढरकवडा यांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेत महत्त्वपूर्ण यश मिळवत एनएच-४४ महामार्गालगत सुरू असलेल्या गांजाच्या चिल्लर विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कब्जातून सुमारे २ किलो १२० ग्रॅम गांजा, चार मोबाईल फोन व दोन मोटरसायकली असा एकूण १,६०,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
🎯 गोपनीय माहितीवरून सापळा
दि. २७/०२/२०२६ रोजी पांढरकवडा पोलिसांना खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, संदिप उर्फ बापु नामदेव गंधेवार (वय ३३, रा. वार्ड क्र. ०१, पिपरी रोड, ता. केळापूर, जि. यवतमाळ) हा एनएच-४४ लगत आपल्या शेताजवळ पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून गांजाची लहान प्लास्टिक पुड्यांमध्ये चिल्लर विक्री करीत आहे.
माहितीची खातरजमा करून सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर परवानगी घेऊन विशेष पथकाने कारवाई हाती घेतली.
🎯 घटनास्थळी तीन जण ताब्यात
🔺पोलिसांनी छापा टाकला असता खालील आरोपी मिळून आले :
🔺संदिप उर्फ बापु नामदेव गंधेवार (वय ३३) रा. वार्ड क्र.1 पिंपरी रोड,पांढरकवडा
🔺आर्यन सतिश मुन (वय २१, रा. महात्मा ज्योतीबा फुले वार्ड, पांढरकवडा)
🔺सुजल अनिल कावडे (वय २१, रा. राममंदीर वार्ड, पांढरकवडा)
आरोपींची अंगझडती व वाहन तपासणीदरम्यान त्यांच्या वाहनाच्या डिकीत ६८ लहान पारदर्शक प्लास्टिक पुड्यांमध्ये भरलेला काळपट-हिरवट गांजा आढळून आला. त्यात फुले, पाने व बिया मिश्रित स्वरूपात गांजा होता.
प्राथमिक तपासात प्रत्येक पुडी १५० रुपयांना विक्रीसाठी तयार करण्यात आली होती. एकूण जप्त मालाची किंमत १०,२०० रुपये इतकी होती. पंचनामा करून पो.स्टे. पांढरकवडा येथे अपराध क्र. ३२८/२०२६ नोंद करण्यात आला असून कलम ८(क), २०(ब), २९ एनडीपीएस अॅक्ट व कलम ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🎯 मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोच
चौकशीत मुख्य आरोपी संदिप गंधेवार याने गांजाच्या पुड्या निखील हेमंत धोडंगी (वय ३०, रा. चिखलगाव, वणी) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेऊन तपास पथकाने वणी येथे धाड टाकली. शासकीय पंच व वैद्य मापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निखील धोडंगी यांच्या घराची झडती घेण्यात आली.
घरझडतीदरम्यान १ किलो ७५१ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ३५,०२० रुपये) जप्त करण्यात आला व आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
🎯 एकूण जप्ती
कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :
🔻गांजा – २ किलो १२० ग्रॅम (एकूण किंमत ४५,२२० रुपये)
🔻चार मोबाईल फोन – किंमत ४०,००० रुपये
🔻दोन मोटरसायकली – किंमत ७५,००० रुपये
🔻 एकूण मुद्देमाल : १,६०,२२० रुपये
🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (यवतमाळ), अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
🎯 कारवाईत सहभागी पथक
ठाणेदार एल. डी. तावरे, सपोनी संदीप नरसाळे, पोउपनी नितीन सुशिर, पोउपनी स्वप्निल कावरे, पो. हवा. प्रमोद जुनूनकर, विलास जाधव, गजानन पत्रे, नापोका सुनील राठोड, सचिन काकडे, संदीप मडावी, किशोर आडे, पो.का. राजू मुत्तेलवार, विशाल वाढई, दुर्गा तलांडे, मीनाक्षी गीते यांनी ही कारवाई यशस्वी केली.
पुढील तपास सपोनी रमाकांत खंदारे करीत आहेत.
🎯 अद्यतन
पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सातत्याने मोहीम राबवली जात असून युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे महामार्ग परिसरातील गांजाविक्रीच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपासात आणखी आरोपी किंवा पुरवठा साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यातील चार ही आरोपींना काल रविवारी पांढरकवडा येथील वि.न्यायालयात हजर केले असता दोघांना PCR मिळाला तर दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.









