ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत मालवली श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन

On: February 23, 2026 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी प्रतिनीधी

ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपुर  येथे उपचारादरम्यान श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता दुःखद निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह संपूर्ण वेळाबाई परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रीमती मानकर या अत्यंत मनमिळावू, शांत स्वभावाच्या आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. आयुष्यात कितीही संकटे किंवा दुःखाचे प्रसंग आले तरी त्यांनी नेहमी हसतमुखाने त्यांचा सामना केला. संयम, सकारात्मकता आणि कुटुंबाप्रती निष्ठा हे त्यांच्या स्वभावाचे प्रमुख पैलू होते.
त्या सामाजिक कार्यात सदैव सक्रिय राहिल्या. गरजू आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करणे हा त्यांचा स्वभावधर्मच होता; मात्र केलेल्या मदतीचा कधीही गाजावाजा केला नाही. समाजासाठी निःस्वार्थी वृत्तीने काम करणे, हीच त्यांची खरी ओळख होती.

शिक्षणाबाबत त्यांची दृष्टी अत्यंत प्रगत होती. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजात फारसे प्रोत्साहन नसतानाही त्यांनी स्वतः पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मराठी साहित्याचा त्यांना विशेष अभ्यास होता आणि भाषेवरील प्रभुत्वामुळे त्या उत्कृष्ट वक्त्या म्हणून ओळखल्या जात. याशिवाय त्यांचा आवाज मधुर होता आणि त्या सुंदरपणे भीमगीते गायन करीत असत. साहित्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असे.
आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण परिवार उच्चशिक्षित केला. मुलींच्या शिक्षणाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले आणि त्यांच्या कष्टांमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुशिक्षित व सक्षम झाला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कुटुंबीयांची व समाजाची मनापासून सेवा केली.

त्यांच्या पश्चात मुली रत्ना, तृप्ती, दीपा, डॉ. सुवर्णा, रुपा, तसेच मुलगा निलेश, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा अंत्यविधी दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या सासरवाडी वेळाबाई येथे पार पडला. अंत्यविधी प्रसंगी वेळाबाई गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार व  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात सर्वांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
श्रीमती सुमन गौतम मानकर यांच्या जाण्याने एक सुसंस्कृत, शिक्षणप्रेमी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांची स्मृती, विचार आणि कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment