ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

शिवगर्जनेत दुमदुमले लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल; विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

On: February 22, 2026 5:19 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनीधी

देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह, देशभक्ती आणि शिवचरित्राच्या प्रेरणादायी वातावरणात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या ओजस्वी सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडेमिक डायरेक्टर तथा प्राचार्य प्रशांत गोडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका सौ. चित्रा देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. मनीषा कापसे आणि सौ. संध्या बेडदेवार यांनी मंचाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाची सुरुवात अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शिवगर्जनेने झाली. इयत्ता दुसरीतील कनक उपाध्ये हिने सादर केलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने वातावरण भारावून गेले. त्यानंतर लावण्या नागमोते हिने प्रभावी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा जिवंतपणे उलगडून दाखवली.

विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. अभिर सरमोकदम याने अफझलखान वध प्रसंगावर शाहीरी शैलीतील दमदार पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये उत्साहाची लहर निर्माण केली. नैतिक ढुमणे, स्मिरल डहाके, जान्हवी एकरे आणि अर्णव मेश्राम यांच्या ओजस्वी भाषणांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी विचार प्रभावीपणे मांडले. रिया समरितकर हिने सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितेने उपस्थितांची मने जिंकली.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘शिवजन्म ते राज्याभिषेक’ हे नाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. जाणता राजाच्या जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रशांत गोडे म्हणाले, “शिवचरित्र हा केवळ इतिहास नसून देशभक्तीचा धगधगता यज्ञकुंड आहे. स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे.”

मुख्याध्यापिका सौ. चित्रा देशपांडे यांनी मनोगतात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. त्यांच्या गुणांचा अंगीकार केल्यासच खऱ्या अर्थाने यश प्राप्त होऊ शकते.”

कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन सौ. रंजू झाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली पिसे यांनी व्यक्त केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment