✍️वणी प्रतिनिधी :
लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट व वणी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, वणी येथे १० वी, ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी भव्य आर्किटेक्चर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक करिअर संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच आर्किटेक्चर क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
🎯 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सम्पदा पेशवे, श्रीमती मनोरमा मुंडले (प्रा. आर्किटेक्चर कॉलेज, नागपूर) उपस्थित होते. तसेच लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ. विजय राठोड, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे सर, आणि विद्यालयाच्या प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे मॅडम मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते.
🎯 प्रास्ताविकातून कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांसाठी अशा करिअरपर कार्यशाळांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यासाठी योग्य दिशा देणे ही शिक्षण संस्थेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

🎯 डॉ. सम्पदा पेशवे यांचे सखोल मार्गदर्शन
मुख्य मार्गदर्शक डॉ. सम्पदा पेशवे यांनी आर्किटेक्चर क्षेत्रातील
🔺उपलब्ध व्यावसायिक संधी,
🔺प्रवेश परीक्षांची माहिती,
🔺महाविद्यालयांतील अभ्यासक्रम,
🔺भारत व विदेशातील करिअरच्या संधी,
🔺आधुनिक तंत्रज्ञानासह आर्किटेक्चरमध्ये होणारे बदल
या सर्व विषयांवर अत्यंत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी उत्साहाने ऐकले आणि करिअरबाबत अनेक शंका त्यांनी दूर केल्या.
🎯 २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यशाळेला १०वी, ११वी आणि १२वीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. शिक्षकवृंदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🎯 सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन
कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक लंकेश चुरे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन विजय भगत सर यांनी मानले.
🎯 राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता
कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
आर्किटेक्चर विषयातील संधी व भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.










