✍️वणी: प्रतिनीधी
लायन्स इंग्लिश मिडीयम विद्यालय, वणी येथे आज “जीवन सुंदर आणि अमूल्य आहे” हा विशेष प्रेरणादायी उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या अफाट प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व माजी प्राचार्य, डी.आय.ई.टी. यवतमाळ येथील डॉ. प्रशांत गावंडे यांनी उपस्थित राहून आपल्या ओजस्वी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनाचे मूल्य, ध्येय निर्धारणाचे महत्त्व, सकारात्मक विचारसरणी आणि कठोर परिश्रमाचा अनिवार्य संबंध प्रभावीपणे पटवून दिला.

🎯 अध्यक्षस्थान व मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार तथा अध्यक्ष – लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणी, लायन संजीव रेड्डी बोदकुरवर यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
🔺लायन्स तुषार नगरवाला (अध्यक्ष, लायन्स क्लब वणी)
🔺लायन्स बलदेव खुंगर (उपाध्यक्ष, लायन स्कूल कमिटी)
🔺लायन अभिजित अणे (सेक्रेटरी, लायन्स क्लब वणी)
🔺लायन शमीम अहमद
🔺लायन महेंद्र श्रीवास्तव (उपाध्यक्ष, लायन्स क्लब)
🔺लायन चंद्रकांत जोबनपुत्रा
🔺लायन डॉ. प्रसाद खानजोडे
🔺लायन शुगवाणी
🔺नितीन पखाले
तसेच विद्यालयाचे अकॅडमी डायरेक्टर श्री. प्रशांत गोडे आणि प्राचार्या श्रीमती चित्रा देशपांडे मान्यवर म्हणून उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनात प्रामाणिकपणा, एकाग्रता आणि सतत प्रगती साधण्याचा संदेश दिला.
🎯 गौरवाचा क्षण
कार्यक्रमादरम्यान लायन संजीव रेड्डी बोदकुरवर यांची नगरवाचनालय, वणी येथे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

🎯 विद्यार्थिनीचा मानाचा सन्मान
शाळेतील वर्ग आठवीतील विद्यार्थिनी कु. स्वरा डोंगरकर हिने नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत दुसरा क्रमांक पटकवून शाळेचा गौरव वाढविला. मार्गदर्शक शिक्षिका सौ. मोहिनी गोहकार आणि सौ. रश्मी कोसे यांनाही या यशासाठी विशेष अभिनंदन करण्यात आले. स्वरा हिचा सन्मान बक्षीस व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
🎯 प्रेरणादायी संवाद आणि भव्य आयोजन
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सोनाली काळे मॅडम यांनी केले तर शेवटी माननीय लायन्स डॉ. अभिजित अणे यांनी मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले.
प्रशासन, शिक्षकवर्ग, नॉन-टीचिंग स्टाफ, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रेरणादायी उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या आणि संस्मरणीय पद्धतीने संपन्न झाला.












