ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अचानक आजाराने तरुणीचा मृत्यू; हनुमान वॉर्डवर शोककळा

On: December 26, 2025 7:46 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरातील हनुमान वॉर्ड येथील रहिवासी कु. आकांक्षा किसनराव म्यानेवार (वय २३) हिचे गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. तिच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून हनुमान वॉर्डसह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कु. आकांक्षा ही बल्लारशा येथील सैनिक शाळेत शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या मूळ गावी पांढरकवडा येथे आली असताना अचानक तिची तब्येत बिघडली. प्राथमिक उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावल्याने तिला तातडीने यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेही अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात आले.
नागपूर येथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी डबल निमोनिया असल्याचे निदान केले होते. सर्वतोपरी उपचार करूनही गुरुवार सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या दरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. तरुण वयात अचानक झालेल्या या आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


आज शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील मोक्षधाम येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीस नातेवाईक, मित्रपरिवार, परिचित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच नम्र श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबीयांचे सांत्वन केले.


कु. आकांक्षा हिचे वडील किसनराव म्यानेवार हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबात तीन मुली असून आकांक्षा ही सर्वात लहान होती. ती मोहन म्यानेवार यांच्या भावाची मुलगी होती. अभ्यासू, शांत स्वभावाची व सर्वांशी आपुलकीने वागणारी म्हणून तिची परिसरात ओळख होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे हनुमान वॉर्डमध्ये शोकमय वातावरण असून, अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनीही तिच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment