ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाईस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळकडून ६५.९८ लाखांचा बंदी असलेला पानमसाला व तंबाखू जप्त; दोन आरोपी ताब्यात

On: December 28, 2025 2:02 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


यवतमाळ जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध गुटखा तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी आंतरराज्यीय गुटखा तस्करीवर धडक कारवाई करत दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू असा एकूण ६५,९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


🎯 गुप्त माहितीवरून सापळा; आयशर वाहन अडवले

यवतमाळ जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करीबाबत कुमार चिता (पोलीस अधीक्षक, यवतमाळ) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी खास खबऱ्यांना सतर्क ठेवले होते.
दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ मार्गे पांढरकवड्याकडे महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.


क्षणाचाही विलंब न करता पांढरकवडा–वणी उपविभाग पथकाने दोन पंचांसह ढोकी गावापुढे (NH-44) सापळा रचून आयशर वाहन क्रमांक UP-94-AT-2305 थांबवले.
दोन आरोपी ताब्यात; १८० पोत्यांचा साठा जप्त
तपासणीदरम्यान वाहनातून वेगवेगळ्या ब्रँडचा सागर पानमसाला व SR-1 Sended Tobacco असा १८० पोत्यांचा साठा आढळून आला.

🎯 ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:
मोहन सियाराम यादव (वय २६, व्यवसाय: ड्रायव्हर, रा. पिचोड, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश)
बुद्धा बाबुसिंग परीयार (वय ३५, व्यवसाय: मजुरी, रा. अमोला थाना, तह. घसारी, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश)
जप्त मुद्देमालाचा तपशील
सुगंधित पानमसाला व तंबाखू (१८० पोते): ₹४५,९२,०००/-
मोबाईल फोन: ₹६,०००/- (अंदाजे)
आयशर वाहन (UP-94-AT-2305): ₹२०,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹६५,९८,०००/-

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; पथकाचे अभिनंदन
ही कारवाई   कुमार चिंता पोलिस अधीक्षक,अशोक थोरात (अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईचे नेतृत्व सतीश चवरे (पो.नि., स्था.गु.शा.) यांनी केले. पथकात दत्ता पेंडकर, धनराज हाके, गजानन राजामलु, पोहवा/सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोशि. सलमान शेख, चापोहवा नरेश राऊत आदी अधिकारी व अमलदारांचा समावेश होता. सर्वांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
पुढील तपास पांढरकवडा पोलीस ठाण्यात
या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन  पुढील तपास पांढरकवडा पोलीस स्टेशन करीत आहे. आंतरराज्यीय साखळी, पुरवठादार आणि संभाव्य वितरकांपर्यंत तपासाचा आवाका वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


अपडेट:
जप्त साठ्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार
वाहनाच्या मालकीबाबत व मार्गनकाशाबाबत चौकशी सुरू
तस्करीमागील मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी स्वतंत्र पथक सक्रिय
ही कारवाई अवैध गुटखा तस्करीविरोधातील प्रशासनाच्या ठाम भूमिकेचे द्योतक असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment