ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

तलाठी संवर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी केळापूर तहसीलसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

On: August 19, 2026 2:02 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळचे वतीने आज केळापूर तहसील कार्यालयासमोर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) केळापूर तालुक्यातील संवर्गाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. तलाठी संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने वारंवार निवेदने व चर्चांनंतरही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

तलाठी संवर्गाच्या एकत्रित सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणे, मंडळ अधिकारी पदोन्नती, काल बाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटर बदलून मिळणे,वेतन निश्चिती, बदली प्रक्रिया, अतिरिक्त प्रभाराचा मेहनताना, आदिवासी प्रोत्साहन भत्ता, कार्यालयीन सुविधा, भाडे, प्रशासकीय खर्च, वैद्यकीय प्रतिपूर्ती आदी एकूण १८ न्याय्य मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाची नोटीस २६ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आली असून ३१ डिसेंबरला डी.एस.सी. टोकन प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहेत. मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि ६ जानेवारी २०२६ पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हे आंदोलन केंद्रीय अध्यक्ष श्री. बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्री. भरत पिसे यांच्या नेतृत्वात पार पडले असून, जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली. संघटनेने प्रशासनाला वेळेत तोडगा काढण्याचे आवाहन केले असून, अन्यथा विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment