ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

तलाठी संवर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी केळापूर तहसीलसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

On: December 31, 2025 6:05 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा| अशफाक खान


विदर्भ पटवारी संघ, नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ (उपविभाग शाखा केळापूर) यांच्या वतीने आज केळापूर येथील तहसील कार्यालयासमोर जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. तलाठी संवर्गाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक, सेवाविषयक व कार्यालयीन मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संघटनेने हे आंदोलन पुकारले.
संघटनेच्या वतीने यापूर्वी 10 ते 12 वेळा निवेदने सादर करण्यात आली होती. तसेच विविध स्तरांवर चर्चा होऊनही केवळ आश्वासनांपलीकडे ठोस निर्णय न झाल्याने, नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


🎯आंदोलनामागील प्रमुख मागण्या
आंदोलनस्थळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तलाठी संवर्गाच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या—
🔺तलाठी संवर्गाची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तातडीने अद्ययावत करणे
🔺मंडळ अधिकारी पदोन्नती देणे व कालबद्ध पदोन्नती लागू करणे
🔺कार्यालयातील कालबाह्य लॅपटॉप व प्रिंटर तत्काळ बदलणे
🔺विनंतीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करणे
🔺अतिरिक्त प्रभार, तसेच अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान कामाचा मेहनताना देणे
🔺वेतन निश्चिती, आदिवासी प्रोत्साहन भत्ता मंजूर करणे
कार्यालयीन फर्निचर, मूलभूत सुविधा उपलब्ध करणे व विद्युत बिल शासनामार्फत भरणे
🔺वैद्यकीय प्रतिपूर्तीची थकीत देयके व 2053 शीर्षकातील प्रलंबित रक्कम अदा करणे
🔺गौण खनिज पथकात कार्यरत तलाठ्यांना संरक्षण, तसेच वार्षिक मूल्यांकन अहवालाची प्रत देणे.


🎯 पुढील टप्प्यांचा स्पष्ट इशारा
संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की,
2 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यानंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास 6 जानेवारी 2026 पासून बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात येईल.
प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवून विदर्भातील 11 जिल्ह्यांत समर्थनात्मक आंदोलन छेडण्यात येईल.


🎯 नेतृत्व व उपस्थिती
हे आंदोलन केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या नेतृत्वात पार पडले. जिल्हा व उपविभाग स्तरावरील पदाधिकारी, तसेच केळापूर तालुक्यातील सर्व तलाठी संवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. आंदोलनाची माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली.
विदर्भ पटवारी संघ, नागपूर – २
उपविभाग शाखा केळापूर | पदाधिकारी (सन 2025–26)
श्री. शालीक कन्नाके – अध्यक्ष
श्री. जगमित्र तुमरे – उपाध्यक्ष
श्री. दीपक पवार – सचिव
श्री. रामेश्वर कुमरे – सहसचिव
कु. पौर्णिमा किनाके – कोषाध्यक्ष
तलाठी संवर्गाच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचा ठाम इशारा संघटनेने यावेळी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment