ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा नगर परिषदेत शिवसेना (शिंदे गट) ची मोठी ताकद – १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याने अतिश  चव्हाण यांची नगर परिषद गटनेतेपदी निवड

On: January 1, 2026 1:48 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा  : अशफाक खान

पांढरकवडा नगर परिषद निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व खेताणी फाऊंडेशनने मोठे यश संपादन केले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष पदासह ६ जागांवर विजय मिळाला असला, तरी संख्याबळाच्या जोरावर शिवसेना (शिंदे गट) व खेताणी फाऊंडेशनच्या पॅनेलने तब्बल १६ जागांवर विजय मिळवत नगर परिषदेत आपली भक्कम ताकद सिद्ध केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे शहरप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक अतिश तानाजी चव्हाण यांची सर्वानुमते शिवसेना (शिंदे गट) च्या नगर परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली. ही निवड जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खेताणी फाऊंडेशनचे प्रमुख सलीम खेताणी यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार करण्यात आली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख (यवतमाळ) राजुदास जाधव यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.


अतिश तानाजी चव्हाण हे कायम गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता असून, संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी शहरातील राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्यांची गटनेतेपदी निवड झाल्याने शिवसेना (शिंदे गट) तसेच खेताणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निवडीनंतर शहरात ठिकठिकाणी अतिश चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात नगर परिषदेत विकासकामांना गती मिळेल, सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या वेळी उपस्थित असलेले शिवसेना (शिंदे गट) चे १६ नगरसेवक पुढीलप्रमाणे :
🔺कल्पना रमेश गेडाम
🔺प्रफुल मोरेश्वर जिड्डेवार
🔺भाग्यश्री रवींद्र कडू
🔺निलेश उत्तमराव चींचाळकर
🔺जयश्री अतिश शेंडे
🔺शैनीला सबरीन समीर खान
🔺योगेश माधव कर्णेवार
🔺दिपाली दिपक नक्षणे
🔺सुरेखा रमेश कटकमवार
🔺मोहंमद युसुफ मोहंमद शब्बीर
🔺अतिश तानाजी चव्हाण
🔺गणेश गोवर्धन धुर्वे
🔺सविता किशोर गटलेवार
🔺लक्ष्मी सतीश जाधव
🔺करिश्मा पवन कुडमथे
🔺काझी सरफरजुद्दीन एनुद्दीन
या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत व पाठिंब्याने अतिश  चव्हाण यांची गटनेतेपदी निवड पार पडली. ही निवड पांढरकवडा नगर परिषदेत आगामी काळात राजकीय समीकरणे व विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment