ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

प्रेस क्लब पांढरकवडाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

On: January 8, 2026 2:55 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन पांढरकवडा येथील प्रेस क्लब पांढरकवडाच्या वतीने सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक विश्रामगृहात सायंकाळी आयोजित या कार्यक्रमास शहरातील पत्रकार, प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व पत्रकारांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहत मराठी पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेचे स्मरण केले.


कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रेस क्लब पांढरकवडाचे अध्यक्ष प्रवीण पिन्नमवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. ते म्हणाले की, ६ जानेवारी १८१२ रोजी जन्मलेल्या आचार्य जांभेकर यांनी १८३२ साली ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा भक्कम पाया घातला. समाजप्रबोधन, विज्ञाननिष्ठ विचारसरणी, विवेकवाद आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार हे त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी सुरू केलेल्या निर्भीड आणि विवेकी पत्रकारितेमुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि मराठी पत्रकारितेला नवी दिशा मिळाली. आजच्या काळातही त्यांचे विचार पत्रकारांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी पत्रकारितेतील नैतिकता, सत्यनिष्ठा आणि समाजहित जपण्याची गरज यावरही विचार मांडण्यात आले. बदलत्या काळात पत्रकारांनी जबाबदारीने व निर्भीडपणे आपली भूमिका बजावावी, असे आवाहनही करण्यात आले.
यानंतर प्रेस क्लब पांढरकवडाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण पिन्नमवार,उपाध्यक्ष सफी खान, सचिव रवि वल्लमवार,  कोषाध्यक्ष योगेश मडावी, ज्येष्ठ पत्रकार अशफाक खान, ज्येष्ठ पत्रकार संभा मडावी, वाजीद कुरेशी, तनवीर शेख, गणेश सामझवार, संतोष मग्गीडवार तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाचा समारोप पत्रकारितेतील मूल्ये, सत्य, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे जपण्याचा संकल्प करून करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment