ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

काळ्या बाजारात जाणाऱ्या 120 क्विंटल तांदळासह ट्रक जप्त उपविभागीय अधिकारी पथकाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

On: January 9, 2026 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या टोळीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 120 क्विंटल अवैध तांदळासह ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई 8 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास केळापूर तालुक्यातील वारा–कवठा गावाजवळ करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धान्य वाहतुकीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तालुक्यातून मोठ्या प्रमाणात तांदळाची अवैध वाहतूक करून तो मध्य प्रदेशातील बालाघाट येथे नेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अमित रंजत यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे केळापूर महसूल विभागाच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू करत वारा–कवठा शिवारात सापळा रचला.

दरम्यान, संशयास्पद हालचाली असलेला ट्रक क्रमांक MP 22 H 1236 महसूल पथकाने अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाचा साठा आढळून आला. आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता चालकाकडे कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक चौकशीत हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी बालाघाट (मध्य प्रदेश) येथे नेला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मनोज कुमार (रा. बालाघाट, मध्य प्रदेश) या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

🎯 तपासाचा विस्तार
🔺जप्त करण्यात आलेला तांदूळ नेमका कोणत्या गोदामातून किंवा शासकीय योजनेतून आणण्यात आला,
🔺या तांदळाचा खरा मालक कोण आहे,
🔺यामागे कोणती टोळी कार्यरत आहे,
🔺यासंदर्भात महसूल विभागाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

🎯 कायदेशीर कारवाई
महसूल विभागाने जप्त केलेला तांदळाने भरलेला ट्रक पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.
प्रशासनाचा इशारा
या कारवाईमुळे अवैध धान्य वाहतूक व काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment