ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणी येथे आर्ट गॅलरी, सायन्स येक्झिबिशन, पुष्प रचना व रांगोळी स्पर्धचे थाटात उद्घाटन

On: January 13, 2026 7:34 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी :प्रतिनीधी


लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी येथे आर्ट गॅलरी, सायन्स एक्झिबिशन, पुष्परचना व रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या बहुआयामी शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन लायन बलदेवजी खुंगर (उपाध्यक्ष, लायन्स स्कूल वणी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन महेंद्राजी श्रीवास्तव (उपाध्यक्ष, लायन्स क्लब वणी) उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कल्पकता आणि बौद्धिक विकास अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

🎯विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
🔺सायन्स एक्झिबिशनमध्ये तब्बल ५८ विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली.
🔺रांगोळी स्पर्धेत ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रंगसंगती व कल्पकतेचे सुंदर दर्शन घडविले.
🔺आर्ट अँड क्राफ्ट विभागात ८६ कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या.
🔺प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेली तयारी, विषयांची मांडणी आणि सादरीकरण पाहून उपस्थित मान्यवर विशेष प्रभावित झाले.

🎯 तज्ज्ञांकडून मूल्यमापन आणि कौतुक
मूल्यमापनासाठी वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे माननीय डॉ. परेश पटेल आणि माननीय डॉ. अजय राजूरकर यांनी विज्ञान प्रकल्पांची तपासणी केली. त्यांनी मत व्यक्त केले की, “विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य दिले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच आत्मविश्वास, निरीक्षणशक्ती आणि संशोधनवृत्ती विकसित होत आहे.”

🎯 उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन
आर्ट गॅलरी पाहताना मान्यवरांना तीन चित्रे विशेष भावली. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देत लायन बलदेव खुंगर यांनी स्वतःकडून एका चित्रासाठी ₹५००/- रोख पारितोषिक दिले, तसेच लायन महेंद्र श्रीवास्तव यांनीही एका चित्रासाठी ₹५००/- जाहीर केले. विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद आणि गुणवत्ता पाहून सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

🎯 शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे
या सर्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन प्रभारी शिक्षक सौ. विजेता ठाकरे, श्री गणेश कोल्हे आणि श्री विकास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नियोजनबद्ध मेहनतीमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि सर्जनशील विचारशक्तीचा विकास होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर सर्वांगीण विकासातही पुढे जात असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत तात्काळ समावेश करा — शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे जोरदार इशारा

100 कोटी ठेवींचा टप्पा पार; गोदावरी अर्बन वणी शाखेची दमदार कामगिरी, व्यवस्थापक विजय मोडक यांचा भव्य सन्मान

वणी विधानसभा क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा: हक्काचे पट्टे आणि घरकुल लवकरच – आमदार संजय देरकर

“जातनिहाय जनगणना आधी, डिलिमिटेशन नंतरच” — विविध सामाजिक संघटनांचे राष्ट्रपतींना ठाम निवेदन

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणावर तीव्र संताप; निर्णय तात्काळ रद्द करण्याची भीम आर्मी ची मागणी

वणी येथे अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेची स्थापना; 160 सदस्यांसह रवींद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम अध्यक्षपदी निवड

Leave a Comment