ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

NEET परीक्षेदरम्यान वहदत-ए-इस्लामीतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

On: June 21, 2026 1:56 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️यवतमाळ : अशफाक खान


राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) निमित्त रविवार दि.21 जून रोजी यवतमाळ शहरातील विविध परीक्षा केंद्रांबाहेर वहदत-ए-इस्लामी हिंद, शाखा यवतमाळ यांच्या वतीने परीक्षार्थींसोबत आलेल्या पालक व नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

जून महिन्यातील तीव्र उष्णता लक्षात घेता ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्राबाहेर अनेक तास प्रतीक्षा करत होते. या परिस्थितीची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत वहदत-ए-इस्लामीने हा उपक्रम राबविला.

शहरातील अमोलकचंद महाविद्यालय, अँग्लो हिंदी हायस्कूल आणि देवराव पाटील विद्यालय (आर्णी रोड) या तीन प्रमुख परीक्षा केंद्रांबाहेर थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेमुळे पालक, नागरिक तसेच उपस्थित परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला.

उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अनेक पालकांनी व नागरिकांनी वहदत-ए-इस्लामीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थी व पालकांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, संस्थेच्या समाजहिताच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शेख मुजीब, फसीउल्लाह खान, अली इम्रान, निसार फारुकी, शकील अहमद, अकिल खान, डॉ. साजिद पटेल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

धरणे, तलावांच्या ५ किमी परिसरात पर्यटनाला बंदी!

टाकळी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; चार दिवसांत पाच जणांचा जलसमाधी

Leave a Comment