ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

On: June 20, 2026 6:40 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी: प्रतिनीधी


वणी उपविभागातील प्रमुख रस्ते, चौक आणि फाट्यांवर कोळसा व सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), यवतमाळ यांना निवेदन सादर केले आहे. तसेच येत्या आठ दिवसांत अवैध पार्किंग हटवून ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योग कार्यरत असल्याने दररोज शेकडो ट्रक, हायवा आणि ट्रेलरची वाहतूक सुरू असते. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्त्याच्या दुतर्फा आणि महत्त्वाच्या फाट्यांवर अवैधरित्या वाहने उभी करतात.

🎯अपघातप्रवण ठिकाणांची यादी

मनसेने विशेषतः खालील ठिकाणांचा उल्लेख करत येथे तातडीने कारवाईची मागणी केली आहे :

🔺ब्राह्मणी फाटा

🔺चारगाव चौकी

🔺बेलोरा फाटा

🔺लालगुडा फाटा

🔺आबई फाटा

🔺मंदर परिसर

🔺लालपुलीया परिसर

या ठिकाणी अवजड वाहने उभी असल्याने समोरून येणारी वाहने, वळणावरील रहदारी किंवा रस्ता स्पष्ट दिसत नसल्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

🎯 “रस्ते बनले मृत्यूचे सापळे”

मनसेच्या मते, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे तसेच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचे धाडस वाढले आहे. परिणामी अनेक गंभीर अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत. या दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे मनसेने म्हटले आहे.

🎯 कठोर कारवाईची मागणी

निवेदनातून खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :

⛔सर्व प्रमुख रस्ते व फाट्यांवरील अवैध ट्रक पार्किंग तात्काळ हटवावे.

⛔नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करावी.

⛔अपघातप्रवण भागांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी.

⛔वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाने नियमित तपासणी करून भविष्यातील अपघात टाळावेत.

🎯आंदोलनाचा इशारा

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सांगितले की,
“प्रशासनाने येत्या आठ दिवसांत वणी उपविभागातील सर्व अवैध ट्रक पार्किंग हटवून रस्ते मोकळे केले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र व खळ्ळखट्याक आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाची राहील.”

🎯 निवेदनावेळी उपस्थित

निवेदन सादर करताना मनसेचे प्रविण कळसकर, प्रविण मांडवकर, प्रदीप बदखल, गौरव बोबडे, मंगेश चिंचोलकर, गोपाल चिंचोलकर, राजू निखाडे, विठोबा चिंचोलकर, संजय चिंचोलकर, विजय निखाडे, चंद्रकांत बोबडे, वैभव पारशिव, करण चीणे, सुजल ताजणे, बंडू आवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

🎯 प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष

या निवेदनाच्या प्रतिलिपी यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक (SP), वणीचे उपविभागीय अधिकारी (SDO), उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP), वणी पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण उपशाखा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर समस्येवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे वणी उपविभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(अपडेट : मनसेने प्रशासनाला दिलेली ८ दिवसांची मुदत संपण्यापूर्वी संबंधित विभागांकडून संयुक्त तपासणी व विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येते का, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

वणीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची राजू उंबरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Comment