ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

On: June 20, 2026 6:55 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी: प्रतिनीधी


वणी येथील सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharmacy) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची नोंद करत संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

यंदाच्या निकालात प्रथम वर्षाचा निकाल 92.59 टक्के, तर द्वितीय वर्षाचा निकाल 95.45 टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎯 प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थी

🔺तुषार भगवानदास तरुणा – 70.90 टक्के
🔺समीक्षा बंडू परचाके – 69.60 टक्के
🔺 पूनम गिरी – 63.80 टक्के

🎯 द्वितीय वर्षातील गुणवंत विद्यार्थी

🔺शिवानी सुभाष अवधारे – 72.36 टक्के
🔺 रुपाली संजय मिलमिले – 70.09 टक्के
🔺 रुपाली विलास पावडे – 69.46 टक्के

महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणपद्धती, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित प्रात्यक्षिके, आधुनिक प्रयोगशाळा आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरण यामुळे हे यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष श्री. मोहन बोनगिनवार, प्राचार्य डॉ. सुनील पवार, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि वणी परिसरातील नागरिकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

“उत्कृष्ट निकाल ही विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाची फलश्रुती आहे,” अशी प्रतिक्रिया महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

वणीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची राजू उंबरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Comment