ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा येथील सिटी प्राइड स्कूल येथे राष्ट्रिय युवा दिनानिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन संपन्न,स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी युवकांना प्रेरणा देण्याचा संदेश

On: January 13, 2026 6:52 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

तालुका विधी सेवा समिती, केळापूर यांच्या वतीने जिल्हा न्यायालय-१ व अतिरिक्त सत्र न्यायालय, केळापूर (पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा दिवस (स्वामी विवेकानंद जयंती) निमित्त सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता संयुक्त न्यूनतम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, पांढरकवडा येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, केळापूर (पांढरकवडा) यांनी भूषविले. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शन, युवकांमध्ये आत्मविश्वास, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी अॅड. श्री. ए. डी. चौधरी (वकील संघ, पांढरकवडा) यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

तर कार्यक्रमात प्रेरणादायी मनोगतासाठी
अॅड. श्री. निलमनी मनवर, वकील संघ, पांढरकवडा
अॅड. श्री. सी. डी. पेठेवार, वकील संघ, पांढरकवडा
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगताद्वारे मा. श्री. ए. एम. देशमुख  यांनी युवकांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व, राष्ट्रउभारणीत युवकांची भूमिका आणि कायदेविषयक जनजागृती यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास पुढील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
श्री. एम. ए. कोठारी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, केळापूर
श्री. के. Exके. माने, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), केळापूर
सौ. ए. एम. कासीम, सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), केळापूर
कु. सायमा शेख, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), केळापूर
श्री. जी. पी. खैरकार, अध्यक्ष, वकील संघ, केळापूर
यासोबतच केळापूर येथील वकील वृंद, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका विधी सेवा समितीच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यासोबतच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा कार्यक्रम सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment