ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

उमरी–करंजी रोडवर भीषण अपघात : ट्रकच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू,  एक तरुणी गंभीर जखमी

On: January 14, 2026 5:17 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

केळापूर तालुक्यातील उमरी–करंजी मार्गावर दर्ग्याजवळ बुधवारी (दि. 14 जानेवारी 2026) दुपारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एका तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात ट्रक चालकाच्या भरधाव व निष्काळजी वाहनचालना मुळे झाल्याचा आरोप असून, संबंधित चालकाविरोधात पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🎯 अपघाताचा थरारक प्रसंग
दि. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास, लिंगटी सायखेडा येथील विकास ज्ञानेश्वर सलाम (वय 26), पायल रोशन कुंभारे (वय 24) आणि सुन्ना येथील तनुजा राजू वाघाडे (वय 20) हे तिघे दुचाकी (क्रमांक MH 29 CF 0773) ने लिंगटी येथून करंजीच्या दिशेने जात होते.
याच दरम्यान करंजी–उमरी रोडवरील दर्ग्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (क्रमांक NH 34 BZ 2932) चालकाने वाहन अत्यंत वेगात आणि निष्काळजीपणे चालवत दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
दोन जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
या भीषण अपघातात विकास सलाम आणि पायल कुंभारे यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तनुजा वाघाडे हिला डोके, छाती व पायांना गंभीर दुखापती झाल्या असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी, मदतीसाठी धावपळ
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. काहींनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त तरुणीला उपचारासाठी रवाना करण्यात आले.

🎯 गावात शोककळा
या हृदयद्रावक घटनेमुळे लिंगटी सायखेडा आणि सुन्ना परिसरात शोककळा पसरली आहे. तरुण वयातच दोन जीव अकाली गेले यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस पाटलांचा जबानी रिपोर्ट, गुन्हा दाखल
या प्रकरणी लिंगटी गावाचे पोलीस पाटील लक्ष्मण दिगांबर वातिले (वय 50) यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये जबानी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अपघात क्रमांक 30/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125(न) अन्वये ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🎯 तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसाळे ( पोलीस स्टेशन, पांढरकवडा) करीत असून,  कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
महत्त्वाची माहिती (संक्षेपात)
🔺 घटनास्थळ : उमरी–करंजी रोड, दर्ग्याजवळ
🔺वेळ : दि. 14/01/2026, दुपारी 4.30वा.
🔺ट्रक क्रमांक : NH 34 BZ 2932
🔺दुचाकी क्रमांक : MH 29 CF 0773
🔺 मृत : 2 (विकास सलाम, पायल कुंभारे)
🔺 जखमी : 1 (तनुजा वाघाडे – गंभीर)
🔺पोलीस स्टेशन : पांढरकवडा
🔺गुन्हा क्रमांक : अप. क्र. 30/2026

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

खोटा गुन्हा ठरला निष्फळ : उच्च न्यायालयाने एफआयआर व आरोपपत्र रद्द; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

Leave a Comment