ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा बुलंद; सातही विषय समित्यांवर शिवसेना (शिंदे गट)चे निर्विवाद वर्चस्व, नगराध्यक्ष भाजपकडे, मात्र सत्तेची सूत्रे पूर्णतः शिवसेनेकडे

On: January 19, 2026 5:18 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान


पांढरकवडा नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांना निर्णायक वळण देत, आज सोमवार (दि. १९) रोजी पार पडलेल्या विषय समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेत शिवसेना (शिंदे गट) ने सातही विषय समित्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या घडामोडीमुळे पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता अधिकृतपणे बळकट झाली आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत २२ नगरसेवकांपैकी शिवसेना (शिंदे गट)चे १६ तर भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते.  नगराध्यक्षपदी भाजपचे   आतिश उर्फ सोनू बोरले विजयी झाले होते, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आतिश चव्हाण यांची निवड झाली होती.

आजच्या विषय समिती निवडणुकीत मात्र सर्व सभापती पदे शिवसेनेकडे गेल्याने नगरपरिषदेत सत्ता संतुलन पूर्णतः शिवसेनेच्या बाजूने झुकले आहे.
दुपारी २ वाजता नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत पुढीलप्रमाणे विषय समित्यांचे सभापती बिन विरोध निवडून आले —
 सार्वजनिक बांधकाम समिती – प्रफुल जिड्डेवार
 शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती – सविता गटलेवार
 स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती – गणेश धुर्वे
 पाणीपुरवठा व जलनिसारण समिती – आतिश चव्हाण
 नियोजन व विकास समिती – शैलीना सबरीन समीर खान
 महिला व बालकल्याण समिती – भाग्यश्री कडू
 उपसभापती पदावर – जयश्री शेंडे
या यशस्वी निवडीला शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास म्हणून पाहिले जात आहे.

🎯 या राजकीय यशाचे श्रेय
पालकमंत्री  संजय राठोड, खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम भैया खेतानी, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, जिल्हा समन्वयक साजिद शरीफ, तालुकाप्रमुख राकेश नेमनवार, मोहसीन काजी यांच्या मार्गदर्शनाला देण्यात आले आहे.

दरम्यान, नगरपरिषद उपनगराध्यक्ष असलेले आतिश चव्हाण यांना पाणीपुरवठा व जलनिसारण समितीचे पदसिद्ध सभापतीपद मिळाल्याने शहराच्या मूलभूत सुविधांवर शिवसेनेचे नियंत्रण अधिक भक्कम झाले आहे.

नवनिर्वाचित सभापतींनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“शहरातील रस्ते विकास, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान काम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.”

या निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरभर जल्लोष पाहायला मिळाला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून पांढरकवड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment