ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

NH-44 वर गोवंशीय जनावरांची तस्करी उघडकीस; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई – 19 बैलांची सुटका, ट्रकसह 23.07 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: January 23, 2026 4:33 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान
दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ (NH-44) वर गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईत १९ बैलांची सुटका करण्यात आली असून ट्रकसह सुमारे २३,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी राम राठोड व गजानन पत्रे हे पांढरकवडा ते पाटणबोरी दरम्यान NH-44 वर पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरकडून येणारा ट्रक (क्रमांक MH 31 FC 4861) गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आदिलाबाद (तेलंगणा) कडे घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने दोन पंचांना बोलावून घेतले व पाटणबोरी येथील माहुली धाब्याजवळ सापळा रचला.

दरम्यान, अतिरिक्त पोलिस मदतीसाठी पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती व सरकारी वाहनाचे चालक महेश धामणकर यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. काही वेळातच संशयित ट्रक नागपूरकडून येताना दिसताच पोलिसांनी त्यास थांबवून पंचासमक्ष तपासणी केली.

🎯 तपासणीत उघडकीस आली भीषण क्रूरता
ट्रकच्या तपासणीत १९ बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून कोंबले असल्याचे दिसून आले. बैलांच्या मानेभोवती आकुड दोऱ्यांनी घट्ट बांधणी करण्यात आली होती, पाय बांधून हालचाल रोखण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. ही बाब प्राणीक्रूरतेचा स्पष्ट प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

🎯 आरोपींची ओळख व कबुली
वाहनचालकास नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव
सय्यद फारुख सय्यद रशिद (वय ३६, रा. भाजी मंडी, कामठी, नागपूर)
असे सांगितले. त्याने कबूल केले की जनावरांचा मालक
शेख मुक्तार शेख मुस्ताक कुरेशी (वय ३६, रा. न्यु मतिन मेम्बर का घर, पुराणा भोईपुरा, कामठी, नागपूर)
यांनी या ट्रकद्वारे जनावरांची वाहतूक करण्यासाठी १ लाख रुपये भाडे दिले आहे.
तसेच तिसरा आरोपी
3) वैभव विनोद उके (वय ३१, रा. बुद्ध नगर, इंदोरा युनिट नं. २, आनंद बुद्धविहारच्या मागे, नागपूर)
हा मजूर मदतनीस म्हणून सोबत असल्याचे निष्पन्न झाले.

🎯 कागदपत्रांचा पूर्ण अभाव
जनावरांच्या वाहतुकीबाबत आवश्यक असलेले वाहतूक परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा कोणतेही अधिकृत कागदपत्र आरोपींकडे नव्हते, हे पंचासमक्ष चौकशीत स्पष्ट झाले.

🎯 जप्त मुद्देमाल
१९ बैलांची अंदाजे किंमत : ₹३,०७,०००/-
ट्रक क्र. MH 31 FC 4861 ची अंदाजे किंमत : ₹२०,००,०००/-
एकूण मुद्देमाल : ₹२३,०७,०००/-
गुन्हा नोंद
या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अप. क्र. ६५/२६ अन्वये आरोपींविरुद्ध पुढील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५) कलम ५, ५(अ), ९
प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ (घ), (ड), (च), (ज), (झ)
म.पो.का. कलम ११९
मोटार वाहन कायदा कलम १३०(१) / १७७

🎯 तपास सुरु
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. लहु तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन पत्रे करीत आहेत.

🎯 पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
या यशस्वी कारवाईमुळे गोवंशीय जनावरांच्या तस्करीवर मोठा आघात बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या सतर्कतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment