ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात ‘सिने संगीत शौकीन मंच’ची सुरेल मैफिल — ३२ गायकांच्या सादरीकरणाने रसिक झाले मंत्रमुग्ध

On: January 26, 2026 6:39 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा येथील सिने संगीत शौकीन मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘सुरांची मैफिल’ हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि सुरेल वातावरणात संपन्न झाला. डॉ. मयूर कडू यांच्या  आखाडा वार्ड येथील निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाने पांढरकवड्यातील संगीतप्रेमी रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनासह सरस्वती व गणेश पूजनाने झाली. यावेळी सौ. भारती विनायक कडू यांनी सादर केलेले अत्यंत भावपूर्ण ‘शारदा स्तवन’ उपस्थितांना भावूक करून गेले. मुख्य गायन सादरीकरणापूर्वी स्व. विमलताई नानाजी उपलेंचवार यांना सुरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या सुश्राव्य मैफलीत जुन्या आणि नव्या काळातील निवडक हिंदी-मराठी चित्रपट गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सुमारे ३२ गायकांनी एकापेक्षा एक सरस आणि भावस्पर्शी गीते सादर करून संपूर्ण परिसर सुरांनी भारावून टाकला. प्रत्येक गीतावर रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले डॉ. मयूर कडू आणि डॉ. तृप्ती कडू यांच्या कन्या —
चि. नेत्रा (वय ५ वर्षे) आणि चि. समायरा (वय ७ वर्षे) यांनी सादर केलेली गीते. लहान वयातच त्यांनी सादर केलेल्या आत्मविश्वासपूर्ण आणि गोड गायनाने उपस्थितांची मने जिंकली आणि त्यांना विशेष टाळ्यांची दाद मिळाली.
डॉ. मयूर कडू यांच्या सशक्त, भावपूर्ण आणि परिपक्व गायकीने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या गायनाने रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

मंचचे संयोजक श्री. दीपक अण्णा कापर्तीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात आनंद, सकारात्मकता, आपुलकी आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते, तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळते.

कार्यक्रमाचे बहारदार, सुत्रसंचालन प्रा. तेजश्री मानेकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी आणि संयत निवेदनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण झीलपीलवार, प्रेमराव वखरे, राहुल भानेगावकर, स्वप्नील कुळकर्णी, डॉ. संजय घावडे, डॉ.  विवेक अंगाईतकर, शंकरराव सातपुते, मुग्धा ताई, महेश अक्केवार तसेच सिने संगीत शौकीन मंचच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी कडू परिवाराने उत्कृष्ट नियोजन, सुयोग्य व्यवस्था आणि स्नेहभोजनाची उत्तम सोय केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. भारती ताई कडू यांनी सर्व गायक, उपस्थित रसिक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

एकूणच, सुरांची मैफिल हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरला असून, पांढरकवड्याच्या सांस्कृतिक जीवनात आणखी एक सुवर्णपान जोडणारा ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment