ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे बेवारस मतिमंद तरुणीला जीवनदान; ‘नंददीप फाउंडेशन’मध्ये सुरक्षित आश्रय

On: January 27, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

मोहदा परिसरात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी एका बेवारस व मतिमंद तरुणीला वेळेत मदत करून तिचे प्राण वाचवले. त्यांच्या तत्परतेमुळे संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय, उपचार व काळजी मिळू शकली असून ही घटना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

मोहदा गावात सुमारे २२ वर्षांची एक मतिमंद तरुणी रस्त्यावर दिशाहीन अवस्थेत फिरताना काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आली. तिची अवस्था अत्यंत दयनीय असून ती स्वतःची ओळख सांगू शकत नव्हती. रस्त्यावर बेवारस अवस्थेत असल्याने तिच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत नागरिकांनी तात्काळ पोलीस पाटील पियुष गबराणी यांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी कोणताही विलंब न करता दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते अमीर कडीवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी मिळून तरुणीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सदर तरुणी आसोली रोड परिसरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी स्वतःच्या खर्चाने वाहनाची व्यवस्था करून संबंधित तरुणीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. तिच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करता तिला तातडीने यवतमाळ येथील ‘नंददीप फाउंडेशन’ येथे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘नंददीप फाउंडेशन’चे संदीप शिंदे यांनी मानवी दृष्टिकोनातून सदर तरुणीला संस्थेत दाखल करून घेतले. तिच्या उपचार, निवारा, भोजन व आवश्यक काळजीची संपूर्ण जबाबदारी संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. त्यामुळे एका बेवारस तरुणीला सुरक्षित जीवनाचा आधार मिळाला आहे.

ही तरुणी जर रस्त्यावरच राहिली असती तर तिच्याबाबत गैरप्रकार घडण्याची, शारीरिक शोषणाची किंवा एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र पोलीस पाटील पियुष गबराणी यांच्या सतर्कतेमुळे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनामुळे मोठा अनर्थ टळला.

विशेष म्हणजे, याआधीही पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी अनेक बेवारस, मतिमंद महिला व पुरुषांना ‘नंददीप फाउंडेशन’मध्ये सुरक्षितरीत्या पोहोचवले असून, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ते केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारे अधिकारी नसून समाजहितासाठी सतत कार्यरत असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या मानवीय कार्यप्रसंगी नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, पोलीस पाटील पियुष गबराणी, सामाजिक कार्यकर्ते अमीर कडीवार तसेच इकबाल शेख उपस्थित होते. मोहदा परिसरातील नागरिकांनी या सामाजिक कार्याबद्दल पोलीस पाटील पियुष गबराणी यांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.
माणुसकी, सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून देणारी ही घटना मोहदा परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात एक सकारात्मक संदेश देणारी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment