ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सिद्धार्थ वस्तीगृह, वणी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

On: January 28, 2026 7:03 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी | प्रतिनिधी

वणी येथील सिद्धार्थ वस्तीगृहामध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.१५ वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी देशाच्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव नवनाथ नगराळे, उपाध्यक्ष एस. एस. सोनारखन यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दुपारी १२ वाजता वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी भाषण व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील होते. तर मार्गदर्शनपर भाषणासाठी सचिव नवनाथ नगराळे, उपाध्यक्ष एस. एस. सोनारखन, सहसचिव प्रा. बाळासाहेब राजुरकर, संचालक अ‍ॅड. वानखडे, डी. एन. कांबळे तसेच कोषाध्यक्ष जगदीश भगत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर वस्तीगृहातील १२ विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे सादर केली.
🧿भाषण स्पर्धेत
🔺प्रथम क्रमांक – विठ्ठल पारखी
🔺द्वितीय क्रमांक – मुकेश भीमराव कुंमरे
🧿गायन स्पर्धेत
🔺प्रथम क्रमांक – आदित्य आसुटकर
🔺द्वितीय क्रमांक – ओम राजू कोल्हेकर
यांनी पटकावला.

यानंतर नवनाथ नगराळे, एस. एस. सोनारखन आणि प्रा. बाळासाहेब राजुरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,

“२६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाले. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून त्याची ओळख आहे. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले असून त्यानुसार देशाचा कारभार चालतो. आज या संविधानाला धक्का देण्याचे प्रयत्न होत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिक सजग असला पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्तीगृहाचे अधीक्षक मंगल तेलंग यांनी केले. संचालन विद्यार्थी करण खुटेमाटे  यांनी केले, तर आभार प्रदर्शन वस्तीगृहाचे कर्मचारी कैलास वडस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना विशेष फिस्ट (भोजन) देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment