ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

ज्येष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लब पांढरकवडाची महत्त्वपूर्ण बैठक दैनिक ‘पब्लिक पोस्ट’यचे तालुका प्रतिनिधी गणेश बेतवार यांची सदस्यपदी निवड

On: January 27, 2026 5:47 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | प्रतिनीधी

प्रेस क्लब पांढरकवडा यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 27 जानेवारी 2026, मंगळवार रोजी पांढरकवडा येथील विश्रामगृहात संपन्न झाली. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार अशफाक खान तसेच सचिव रवि वल्लमवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या बैठकीत पत्रकारितेची गुणवत्ता, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांच्या समस्या, संघटन मजबूत करणे तसेच सामाजिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील जनतेपर्यंत सत्य व अचूक माहिती पोहोचविण्यासाठी प्रेस क्लबची भूमिका अधिक सक्रिय कशी करता येईल, यावरही सदस्यांनी आपली मते मांडली.

बैठकीदरम्यान दैनिक ‘पब्लिक पोस्ट’चे तालुका प्रतिनिधी गणेश बेतवार यांची प्रेस क्लब पांढरकवडा सदस्यपदी अधिकृत निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. पत्रकारितेतील त्यांचा अनुभव आणि कार्य पुढील काळात प्रेस क्लबच्या कार्याला नक्कीच बळ देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला प्रेस क्लब पांढरकवडा चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विशेषतः
उपाध्यक्ष सफी खान, तनवीर शेख, वाजीद कुरेशी, गणेश सामजवार, संतोष मग्गीडवार, गणेश बेतवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीच्या शेवटी संघटनेची एकजूट कायम ठेवण्याचा तसेच पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला. प्रेस क्लब पांढरकवडा आगामी काळात सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment