ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात मानवतेला काळीमा : नवजात मुलीला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना, तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी

On: January 28, 2026 6:45 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ (हनुमान वार्ड) येथे नवजात मुलीला नाल्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक, अमानवी व समाजाला हादरवून टाकणारी घटना आज बुधवार दि. 28 जानेवारी रोजी पहाटे उघडकीस आली आहे. ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून मानवतेचा खून, बालहक्कांचे गंभीर उल्लंघन आणि संविधानिक मूल्यांवर आघात करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हनुमान वार्ड परिसरात नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाजवळून वाहणाऱ्या नाल्यात पहाटे सुमारे 3.30 ते 4.00 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाला सतत कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी त्या दिशेने जाऊन पाहिले. त्यावेळी कुत्र्यांच्या आवाजासोबत लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना जागे केले.

त्यानंतर 2 ते 3 नागरिकांनी मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने नाल्यात पाहणी केली असता, नाल्याच्या आत एका नवजात मुलीला टाकण्यात आल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे त्या बाळाच्या नाळेवर वीट ठेवलेली होती तसेच आजूबाजूला दोन ते तीन दगड आढळून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मन सुन्न झाले.

परिसरातील महिलांनी प्राथमिक पाहणीनंतर हे बाळ अवघ्या 1 ते 2 तासांपूर्वीच जन्मलेले असावे, असा अंदाज व्यक्त केला. नागरिकांनी कोणताही विलंब न करता त्या तान्ह्या बाळाला नाल्यातून बाहेर काढून तत्काळ पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बाळाला यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या बाळावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या अमानवी घटनेमुळे संपूर्ण पांढरकवडा शहरात संतापाची लाट उसळली असून समाजमन हादरून गेले आहे. नवजात बालिकेच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संघटना व महिला संघटनांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संबंधित मातेसह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध लावावा, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ही घटना समाजासाठी डोळे उघडणारी असून अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(अपडेट अपेक्षित : पोलिस तपास, सीसीटीव्ही फुटेज व वैद्यकीय अहवालानंतर पुढील माहिती प्रसिद्ध केली जाईल.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment