ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

नाल्यातून नवजात अर्भक फेकल्याची धक्कादायक घटनेचा पर्दाफाश पांढरकवड्यात पोलिसांची दोन तासांत आरोपी माता-पित्याचा शोध घेऊन अटक

On: January 28, 2026 1:52 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान

पांढरकवडा शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली होती.  नाल्यामध्ये नवजात स्त्री अर्भक फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता.त्यामूळे संपूर्ण शहरात आज सकापासूनच प्रचंड खळबळ उडाली होती .  या प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी माता-पित्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी बुधवारी पहाटे सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास हनुमान वार्ड, पांढरकवडा येथील रहिवासी केतन गजानन कटकोजवार (वय ३३ वर्षे) यांनी पोलीस स्टेशनला जबानी तक्रार दिली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या जुन्या घराशेजारील नाल्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी व शेजाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी नवजात स्त्री अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ माणुसकी दाखवत बाळाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे उपचारासाठी दाखल केले होते. सध्या बाळावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ११९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन तासांत आरोपींचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक गठीत केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक चौकशीच्या आधारे अवघ्या दोन तासांत पोलिसांनी नवजात बाळाचे आई-वडील कोण आहेत याचा शोध लावला.

तपासात निष्पन्न झाले की,
माता : अर्चना सुनिल शिवरकर (वय २८ वर्षे)
पिता : सुनिल पिंगाबर शिवरकर (वय ३१ वर्षे)
दोघेही रहिवासी – नेहरू वार्ड, पांढरकवडा
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. बाळाला नाल्यात का फेकण्यात आले, यामागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

🎯 ही संपूर्ण कारवाई
कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ
अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक
रॉबिन बन्सल, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील
पोउपनि नितीन सुशीर, पोहेकॉ प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, मपोहेकॉ दूधना मसराम, मपोशी ज्योत्स्ना तलांडे, चालक सहा. फौ. प्रफुल्ल पावसेकर
यांनी ही यशस्वी कारवाई केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे व पोहेकॉ विशाल वाढई करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment