ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्ष अत्याचार, आरोपी ताब्यात

On: January 30, 2026 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

पांढरकवडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल; POCSO व BNS अंतर्गत कारवाई


✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे अप.क्र. १३६/२०२६ अन्वये आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.

🎯 पीडितेची पार्श्वभूमी
पीडित मुलगी ही आपल्या परिवारासह  पांढरकवडा हद्दीतील एका गावात वास्तव्यास आहे. पीडितेचे जन्मवर्ष २००९ असून ती कायद्याने अल्पवयीन आहे.

🎯 ओळख व अत्याचाराचा प्रकार

तक्रारीनुसार, पीडिता ही किरण हुसेन बोरकर वय अंदाजे २० वर्षे यास जुलै २०२४ पासून ओळखत होती. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली होती.
ओळख झाल्यानंतर साधारण ७ दिवसांच्या आत, आरोपीच्या घरी कोणी नसताना पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने “आपण लग्न करू” असे सांगून तिच्याशी पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने वारंवार लग्नाचे आमिष दाखवून, स्वतःच्या घरी तसेच काकाच्या घरी कोणी नसताना पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

🎯 मारहाणीची घटना
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता, आरोपीने दारूच्या नशेत पीडितेशी वाद घालून तिला हाताने मारहाण केली. या घटनेनंतर पीडितेने धैर्य एकवटून  दि. 30 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

🎯 कायदेशीर कारवाई

या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे आरोपीविरोधात पुढील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे—
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६४(२)(म), ६५(१), ११५(२)
POCSO अधिनियम कलम ४ व ६
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ३(२)(va)

🎯 आरोपी ताब्यात

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्यास तपासकामी ताब्यात घेतले आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता,  अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात व  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक श्री. एल.डी. तावरे यांच्या सूचनेनुसार सपोनि सागर पेंढारकर व पोशि विकेश ध्यावर्तीवार यांनी ही कारवाई केली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबीन बन्सल हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment