ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा–अकोला ‘लाल परी’ बसची :  महिलेला जोरदार धडक, जागीच मृत्यू

On: January 30, 2026 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान

पांढरकवडा आगारातून सायंकाळी 4.30 वाजता अकोलाकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ बसचा भीषण अपघात आज दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजताच्या दरम्यान घडला. जोडमोहा व येरद–शरद दरम्यानच्या रस्त्यावर शेळी (खटेश्वर) फाट्या नजिक एका महिलेला बसने जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव सिंधुबाई भीमराव सखापुरे  वय 45 वर्ष असे असून त्या खैरी, ता. कळंब, जि. यवतमाळ येथील रहिवासी होत्या. अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH 14 MH 1485 असून ही बस पांढरकवडा डेपोची आहे.

संबंधित ठिकाणी रस्त्याच्या कडेला असताना अचानक बसची धडक बसल्याने महिला दूर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन, यवतमाळचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी  यवतमाळ येथे पाठविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment