ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

रूंझा येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा इसम ताब्यात, पोलिसांची तात्काळ कारवाई; धारदार तलवार जप्त

On: January 31, 2026 11:12 AM
Follow Us:
---Advertisement---

शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल



✍️पांढरकवडा | अशफाक खान

पोलीस स्टेशन पांढरकवडा अंतर्गत येणाऱ्या रूंझा गावात हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इसमावर पांढरकवडा पोलिसांनी तात्काळ व धाडसी कारवाई करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

आज  शनिवार दिनांक ३१/०१/२०२६ रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, रूंझा (बेघर) येथील रहिवासी शेख कलिमोद्दीन शेख कबिरोद्दीन (वय ४० वर्षे) हा त्याच्या एका हातात धारदार व टोकदार लोखंडी नंगी तलवार बाळगून गावातील वार्ड क्रमांक ०२ मध्ये फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. तसेच तो दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
सदर गंभीर बाब लक्षात घेत पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदारांना आवश्यक मार्गदर्शन करून संबंधित ठिकाणी रवाना केले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने वेगाने हालचाल करत रूंझा गावातील वार्ड क्रमांक ०२ येथे धडक देत, हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या इसमास शिताफीने पकडले.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातील लोखंडी, टोकदार व धारदार तलवार जप्त करण्यात आली असून, याबाबत जप्ती पंचनामा तयार करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे अपराध क्रमांक १४१/२०२६ नोंद करण्यात आला असून, त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई 

🔺पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता(यवतमाळ),
🔺अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात (यवतमाळ),
🔺सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील
🔺पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर,
🔺पोहेकॉ प्रमोद जुनुनकर,
🔺पोना सचिन काकडे,
🔺संदीप मडावी,
🔺पोकॉ राज मुत्यालवार
यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.
नागरिकांमध्ये समाधान
या तात्काळ व प्रभावी पोलिस कारवाईमुळे रूंझा गाव व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment