ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पाटणबोरीतून  पिंपरीकडे  जाणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस; 1.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: February 1, 2026 12:33 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: सारीम  खान

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोवर पांढरकवडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत तब्बल 1 लाख 65 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई  आज रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली असून, एका ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाटणबोरी येथून पिवळ्या रंगाचा ऑटो (क्र. AP-01TA-0072) अवैधरित्या दारू घेऊन पिंपरीकडे जात आहे. माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयित ऑटो अडवला.

ऑटोची झडती घेतली असता मागील बाजूस खाकी रंगाच्या चार बॉक्स आढळून आले. पंचासमक्ष बॉक्स उघडून पाहणी केली असता प्रत्येक बॉक्समध्ये 48 प्रमाणे एकूण 192 सिलबंद पव्वे ‘बॉबी संत्रा’ देशी दारू (180 एमएल) आढळून आले. प्रत्येकी 80 रुपयांप्रमाणे या दारूची किंमत 15,360 रुपये इतकी आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऐपे कंपनीचा ऑटो रिक्षा (अंदाजे किंमत 1,50,000 रुपये) जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विठ्ठल लच्छमन्ना बासावार (वय 47, रा. वठोली, ता. झरी, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोउपनि नितीन सुशीर, पोहवा विलास जाधव, पोना सचिन काकडे, संदीप मडावी आणि पो.कॉ. राजू मुत्यालवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.

पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांचा धाक कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment