ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

प्रेस क्लब पांढरकवडाची नवीन कार्यकारिणी जाहीर; प्रवीण पिन्नमवार यांची अध्यक्षपदी सलग फेरनिवड

On: February 1, 2026 5:15 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | सारीम खान

प्रेस क्लब पांढरकवडाची अत्यंत महत्त्वाची कार्यकारिणी बैठक ज्येष्ठ पत्रकार अशफाक खान यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी येथील विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वानुमते प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामुळे स्थानिक पत्रकारितेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बैठकीत अध्यक्षपदी प्रवीण पिन्नमवार यांची सलग फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रेस क्लबने आतापर्यंत विविध उपक्रम राबवले असून, पत्रकारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्यावर विश्वास दर्शवत सदस्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.

नवीन कार्यकारिणीत सफी खान यांची उपाध्यक्षपदी, रवि वल्लमवार यांची सचिवपदी तर गणेश सामजवार यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने झाल्याने संघटनेतील एकजूट आणि विश्वास अधोरेखित झाला.

या प्रसंगी संतोष मग्गीडवार, तनवीर शेख, वाजीद कुरेशी, गणेश बेतवार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. बैठकीत पत्रकारांच्या व्यावसायिक अडचणी, वाढत्या आव्हानांचा सामना, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बदलत्या माध्यम क्षेत्रात पत्रकारांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, तरुण पत्रकारांना प्रोत्साहन देणे आणि संघटनेला अधिक मजबूत बनविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच प्रेस स्वातंत्र्य अबाधित राखणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि समाजाभिमुख पत्रकारितेला चालना देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात पत्रकारांसाठी कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचे संकेतही देण्यात आले.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे प्रेस क्लब पांढरकवडामध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील विविध क्षेत्रांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवत समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ही टीम निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment