ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

नकलांनी प्रेक्षक हसून-हसून लोटपोट; लोककला लोकाश्रयावरच जिवंत राहणार – डॉ. दिलीप अलोने

On: February 3, 2026 3:26 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी :प्रतिनीधी

लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब लोककलेतून उमटते. मात्र बदलती अभिरुची, आधुनिकतेचा अतिरेक आणि वाढते सांस्कृतिक आक्रमण यामुळे लोकाश्रयावर जिवंत राहणाऱ्या लोककला हळूहळू मागे पडत आहेत. त्यामुळे अशा लोककलांचे जतन व संवर्धन करणे ही आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांनी केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत वांजरी येथे आयोजित विशेष शिबिरात नकलांच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपस्थित विद्यार्थी, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जुंगरी यांनी डॉ. दिलीप अलोने यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर सरपंच अरुणाताई जेनेकर, उपसरपंच अमोल कुंभारे तसेच विकास जेनेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अलोने यांनी सध्याच्या सामाजिक वास्तवाचे भान जपण्यासाठी संवेदनशीलता जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. समाजातील विसंगती, राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या भावना या विषयांवर आधारित नकलांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी भाष्य केले.
“पट्ट्या महाद्या, मावलगन कवा होणार, मला निवडून द्या” अशा विनोदी पण आशयपूर्ण नकलांनी त्यांनी प्रेक्षकांना हसून-हसून लोटपोट होण्यास भाग पाडले. त्यांच्या समर्थ अभिनयशैली, अचूक संवादफेक आणि प्रसंगानुरूप विनोदामुळे संपूर्ण वातावरणात हास्याची लाट उसळली.
डॉ. अलोने यांच्या सादरीकरणाला विद्यार्थी व ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद व टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या या नकलांनी उपस्थितांना विचार करायलाही प्रवृत्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय बिलोरीया, स्वयंसेवक दुष्यंत खामनकर, ऋतुजा रामगिरवार, नीलिमा काथोटे, रुद्र कनाके आदींनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमामुळे लोककलेचे महत्त्व अधोरेखित होत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment