✍️पांढरकवडा | अशफाक खान
आज दिनांक 3/2/2026 रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, शेख अजहरूद्दीन शेख हफिजोद्दीन (वय ३१ वर्षे) व शाहरूख खान अयुब खान (वय ३१ वर्षे), दोघेही रा. पांढरकवडा, यांच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH32 AS 7407 मध्ये एक धारदार व टोकदार लोखंडी तलवार बाळगून आहेत.
सदर माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून नमूद इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
🎯 पंचासमक्ष वाहनाची झडती
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, वाहनामधून एक धारदार, टोकदार लोखंडी तलवार (किंमत अंदाजे ₹१,५००/-) मिळून आली.
यावेळी पोलिसांनी पुढील मुद्देमाल पंचनाम्याप्रमाणे जप्त केला —
🔺एक लोखंडी धारदार तलवार – किं. अं. ₹१,५००/-
🔺चारचाकी वाहन MH32 AS 7407 – किं. अं. ₹५,००,०००/-
🔺दोन मोबाईल फोन – किं. अं. ₹४५,०००/-
🎯 शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल
सदर प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे अपराध क्रमांक १५१/२०२६ नोंदविण्यात आला असून,
त्यांच्यावर शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (यवतमाळ),
मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात (यवतमाळ)
आणि मा. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील —
पोलीस उपनिरीक्षक नितिन सुशिर,
पोहेकॉ प्रमोद जुनुनकर, विलास जाधव,
पोना सचिन काकडे, संदीप मडावी,
पोकॉ राज मुत्यलवार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
🎯 कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक संदेश
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जात असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.










