ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात नवसाच्या मारोती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी दोन दानपेट्या पळविल्या; भाविकांमध्ये संताप, पोलिसांकडून तपास सुरू

On: February 4, 2026 4:59 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान

पांढरकवडा शहरात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चालबर्डी रोड परिसरातील रामदेव बाबा लेआऊटसमोरील नवसाचा मारोती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत मंदिराच्या गाभाऱ्यात आणि सभामंडपात ठेवलेल्या स्टीलच्या दोन दानपेट्या चोरट्यांनी पळवून नेल्या, अशी माहिती समोर आली आहे.

ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, सकाळी नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करण्यासाठी मंदिरात आलेल्या भाविकांच्या लक्षात सुरुवातीला काहीही संशयास्पद बाब आली नाही. मात्र काही वेळानंतर दानपेट्या त्यांच्या जागेवर नसल्याचे दिसून आले. तपासणी केल्यानंतर दोन्ही दानपेट्या चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.


प्राथमिक अंदाजानुसार या दानपेट्यांमध्ये सुमारे चार ते पाच हजार रुपयांची रोकड होती. नवस फेडण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीसाठी भाविकांकडून दिलेली ही रक्कम चोरीला गेल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पांढरकवडा पोलिस ठाण्यात कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व स्थळ पंचनामा केला.
या प्रकरणी संजय सीताराम झोटिंग (वय ५२) यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील आसपासच्या घरांवरील व दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी लवकरच आरोपींचा माग काढून चोरीचा उलगडा करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment