ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात इस्माईली खोजा समाजातर्फे भव्य मॅराथॉनचे आयोजन,

On: February 5, 2026 5:21 PM
Follow Us:
---Advertisement---

५ वे आगा खान इमामशहा रहीमशहा आगाखान साहब यांच्या इमामतला एक वर्ष पूर्ण झाल्याचा उत्साहात साजरा


✍️पांढरकवडा | अशफाक खान

बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्माईली खोजा समाजाचे ५वे आगा खान, इमामशहा रहीमशहा आगाखान साहब यांच्या यशस्वी इमामतला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पावन निमित्ताने पांढरकवडा येथील इस्माईली खोजा समाजाच्या वतीने भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ६ वाजल्यापासून ते ७.३० वाजेपर्यंत पांढरकवडा येथील डी.पी. रोड परिसरात ही मॅराथॉन पार पडली. या उपक्रमाला समाजातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला व पुरुष अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संपूर्ण मार्गावर उत्साह, शिस्त आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.

मॅराथॉननंतर सर्व सहभागी सदस्यांनी एकत्र येत केक कापून आनंद साजरा केला तसेच सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी परस्पर शुभेच्छा देत इमामतच्या पहिल्या यशस्वी वर्षाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.

५ वे आगा खान साहब यांनी इस्माईली खोजा समाजाला आपल्या संदेशातून आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या प्रेरणादायी आवाहनाला अनुसरूनच, इमामतला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात आरोग्य व फिटनेसचा संदेश देणारा हा मॅराथॉन उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला स्थानिक इस्माईली समाजाचे प्रमुख नूरुद्दिन गिलानी, इद्रिस जिवानी यांच्यासह जमातचे सर्व स्थानिक मान्यवर, महिला सदस्य, युवक-युवती तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

एकूणच, पांढरकवडा शहरात इस्माईली खोजा समाजातर्फे आयोजित ही मॅराथॉन आरोग्य, एकता आणि आनंदाचा संदेश देणारी ठरली असून, ५वे आगा खान इमामशहा रहीमशहा आगाखान साहब यांच्या इमामतच्या पहिल्या वर्षाच्या उत्सवाला एक विशेष सामाजिक स्वरूप लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

आसोली (तांडा) येथे भीषण आग; गोठा जळून खाक, गाय ठार – शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पाटणबोरीत वरली मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; दोन जण ताब्यात, रोख रक्कम जप्त

पांढरकवड्यात गॅससाठी हजारोंची रांग – नागरिक त्रस्त, प्रेरणा गॅस एजन्सी समोर तासन्‌तास उभे नागरिक; पाणी-सावलीचीही व्यवस्था नाही

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : दोन ट्रकमधून ४९ गोवंशांची सुटका; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करी उधळली; पोलिसांची धडक कारवाई, १४ बैलांची सुटका, वणी येथील एका आरोपीसह नागपूर, भंडारा येथील 4 जण ताब्यात

पांढरकवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : हरविलेले ४७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत; ३.७५ लाखांचे २५ मोबाईल सुपूर्द

Leave a Comment