ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

“विनोद पुसनाके अमर रहे!” — CRPF जवानास अश्रुपूर्ण अखेरचा निरोप; बोथ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

On: February 7, 2026 2:13 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान

केळापूर तालुक्यातील बोथ गावचे सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत असलेले जवान विनोद पुसनाके (वय ४५) यांना शनिवारी (ता. ७) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अश्रुपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर बोथ रोडलगत असलेल्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

मध्यप्रदेशातील निमज येथे तैनात असलेले जवान विनोद पुसनाके हे ६ फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर परतताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

🎯 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण;

नागपूरहून पांढरकवड्याकडे पार्थिव, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर जवान विनोद पुसनाके यांचे पार्थिव नागपूर येथून पांढरकवडा येथे आणण्यात आले. शुक्रवारी रात्री नीलकंठ नगरी येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.

“भारत माता की जय”च्या घोषणांत पार्थिवाला मानवंदना
शनिवारी सकाळी पार्थिव बोथ येथे आणण्यात आले. बोथ फाटा परिसरात CRPF चे वाहन पोहोचताच “भारत माता की जय”, “विनोद पुसनाके अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हजारो युवक, ग्रामस्थ, माजी सैनिक व विविध संघटनांचे पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

घरात पार्थिव पोहोचताच आई-वडील, पत्नी आणि तीन मुलींचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.

🎯 शासकीय मानवंदना;

बंदुकीच्या फैरी झाडून अंतिम सलामी
अंत्यसंस्कारावेळी CRPF कडून बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी CRPF चे डी.सी. बनवारीलाल मीना,  पांढरकवडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार एल.डी. तावरे, एपीआय सागर पेंडारकर, केंद्रीय राखीव पोलीस दल नागपूरचे पोलीस निरीक्षक ईश्वर शेठी, तसेच माजी सैनिक संघटना पांढरकवडा, जय जवान माजी सैनिक संघटना वणी यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

🎯 बोथ बाजारपेठ बंद;

गावात तिरंगा आणि श्रद्धांजली बॅनर
जवान विनोद पुसनाके यांच्या सन्मानार्थ बोथ गावातील बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. गावात ठिकठिकाणी तिरंगा ध्वज व श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्ती आणि शोकभावनेच्या वातावरणात न्हाऊन निघाला होता.

🎯 पश्चात परिवार

जवान विनोद पुसनाके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली आणि दोन भाऊ असा परिवार आहे. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि देशसेवेचा अभिमान बाळगणारे जवान म्हणून त्यांची ओळख होती.
देशासाठी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या या वीर जवानाला संपूर्ण परिसराने अश्रूंनी आणि अभिमानाने निरोप दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment