ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

केशरबाई चाहल स्मृती दिनानिमित्त 10 फेब्रुवारी रोजी सन्मान सोहळा; काजी गजनफर अली व कवयित्री पुष्पा पाटील यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करणार

On: February 8, 2026 4:02 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा :  अशफाक खान

केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठान, पांढरकवडा (जि. यवतमाळ) यांच्या वतीने मातोश्री केशरबाई चाहल यांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त भव्य सन्मान गौरव व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

हा सोहळा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता श्री शारदा ज्ञानपीठ, पांढरकवडा येथे संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री  श्री. शिवाजीराव मोघे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार, संपादक व प्रभावी वक्ते तसेच पांढरकवड्याचे सुपुत्र श्री. बाळ कुळकर्णी उपस्थित राहतील. अतिथी म्हणून विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. गोकुल गंधे कार्यक्रमाला लाभणार आहेत.

🎯 सामाजिक ऐक्याचे प्रतीक काजी गजनफर अली यांना सामाजिक पुरस्कार
संस्थेच्या वतीने सन २०२४–२५ चा ‘केशरबाई चाहल स्मृती सामाजिक पुरस्कार’ पांढरकवडा येथील हिंदू–मुस्लिम एकता व सामाजिक सौहार्द्राचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे काजी गजनफर अली साहेब (माजी मुख्याध्यापक, जामा मशीद ट्रस्ट व शांतता कमिटी अध्यक्ष) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११,००० रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे. समाजात सलोखा, परस्पर आदर आणि शांततेचा संदेश देत त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी पुष्पा पाटील यांचा सन्मान
सन २०२३–२४ चा केशरबाई स्त्री पुरस्कार संवेदनशील कवयित्री, समीक्षक व चिंतनशील लेखिका श्रीमती पुष्पा पाटील (मीना बिसेटवार), पुणे यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ५,००० रुपये रोख, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

🎯 गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

शैक्षणिक सत्र २०२४–२५ मधील शालांत परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये –
🔺शेखर सुरेश मल्लेलवार – शाळेत प्रथम (९५.६०%) : २१०० रुपये रोख (संस्थेतर्फे)
🔺कु. कल्याणी विष्णू कराळे – ‘मराठी’ विषयात प्रथम (९८ गुण) : १००० रुपये रोख
🔺कु. टिया हरिभाऊ गुरनुले – ‘इंग्रजी’ विषयात प्रथम (९८ गुण) : ५०० रुपये (कै. अजाबराव चौधरी स्मृती प्रित्यर्थ)
🔺कु. हंसिका मनिष बुर्रेवार व कु. साची दिपक वरगणे – ‘गणित’ विषयात प्रथम (९७ गुण) : प्रत्येकी ५०० रुपये (सौ. कानन व श्री. किरणराव अमेरिका यांच्यातर्फे)
🔺कु. श्रुती राजीव आगरकर व शेखर सुरेश मल्लेलवार – ‘विज्ञान’ विषयात प्रथम (९८ गुण) : प्रत्येकी ५०० रुपये (डॉ. स्नेहल दिवेकर / डॉ. संदीप दिवेकर, ठाणे यांच्यातर्फे)
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

🎯 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन
कार्यक्रमाचे संचालन व परिचय तनवीर शेख आणि प्रिया उमरे करणार असून राहुल देवतळे आभार प्रदर्शन करतील.
केशरबाई चाहल यांच्या स्मृती जपताना समाजहित, शिक्षणप्रेम आणि स्त्री-सक्षमीकरण या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. यंदाचा स्मृतीदिन सोहळा सामाजिक सलोखा, साहित्यिक परंपरा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा उत्सव ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजीतसिंह यांनी नागरिक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी या प्रेरणादायी सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment