ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

On: February 25, 2026 3:18 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान

स्थानिक सुराणा भवन येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी मंगळवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या मेळाव्यात पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच आगामी राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना दिशा देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विष्णू राठोड यांनी प्रभावी शब्दांत करत मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत सर्वांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

मेळाव्यादरम्यान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न जाणून घेतले. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष असून तळागाळातील नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आगामी काळात जनतेशी अधिक संवाद वाढवून विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघातील पाणी, शेती, रोजगार, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील समस्या मांडत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी खासदार धानोरकर यांनी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत अनेक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनाला नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटन अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसून आली.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी एकजुटीने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवून लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे संपूर्ण परिसर काँग्रेसमय वातावरणाने भारावून गेला होता.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी आमदार वामनराव कासावार, प्रदेश उपाध्यक्ष आरिज बेग, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे, ॲड. अनिल किनाके, रामकृष्ण पाटील वंजारीकर, निमीष मानकर, विजय पाटील चालबर्डीकर, अमर पाटील, मनोज भोयर, बिशनसिंग संधो, प्रेम राठोड, विजय तेलंगे, प्रशांत बोंडे, डच्चु सोखी, अंकित नैताम, सिन्नूअण्णा नालमवार, प्रेमजीत धोपे, विष्णू राठोड, प्रा. उगले सर, ॲड. शेंडे, अनिस पोसवाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानत मेळाव्याची सांगता करण्यात आली. या भव्य मेळाव्यामुळे पांढरकवडा परिसरात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना नवे बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शौर्य, स्वराज्य आणि संस्कारांची प्रेरणा; सिटी प्राईड स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Comment