ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वेळाबाई (वणी) येथील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास, केळापूर विशेष न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय; पीडितेला नुकसान भरपाई

On: March 4, 2026 5:33 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात केळापूर विशेष न्यायालयाने आरोपीस कडक शिक्षा सुनावत न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी महेश मारोतराव बबले (वय २८, रा. वेळाबाई) यास २० वर्षे सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा (अतिरिक्त सत्र) न्यायाधीश केळापूर श्री. अभिजीत एम. देशमुख यांच्या न्यायालयाने दि. ४ मार्च २०२६ रोजी सुनावली.

🎯 घटना कशी घडली?
सदर घटना दि. १३ जानेवारी २०१७ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता घडली होती. पीडिता आपल्या मैत्रिणीसोबत गावातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डान्सची प्रॅक्टिस करून घरी परतत असताना गावातील आरोपी महेश बबले याने तिचा हात पकडून जबरदस्तीने ओढत गावाशेजारील एका शेताजवळ नेले.
तेथे आरोपीने पीडितेचे हात दोरीने बांधले व तोंडात रुमाल कोंबून तिला बाभळीच्या झाडाखाली नेऊन तिच्यावर दोन ते तीन वेळा अत्याचार केला. घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आरोपी तेथून पसार झाला.
पीडितेने कसाबसा स्वतःचे हात सोडवून घरी जाऊन आई-वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलीस स्टेशन शिरपूर येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

🎯 कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध खालील कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता —
भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३५४(डी), ३४२, ३७६, ३७६(२)(एन), ५०६
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ – कलम ४
अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ – कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(V), 3(2)(Va)
या प्रकरणाची नोंद अपराध क्र. ०५/२०१७ अन्वये करण्यात आली होती.

🎯 तपास व न्यायालयीन प्रक्रिया
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (वणी) यांनी केला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रकरण विशेष न्यायालय, केळापूर येथे न्यायप्रविष्ट करण्यात आले.
अभियोग पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश डी. मोरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायालयात एकूण १२ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले.

🎯 न्यायालयाचा निर्णय
सर्व पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली —
POCSO कायदा कलम ४ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपये दंड
भादंवि ३४२ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड
भादंवि ३५४ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपये दंड
भादंवि ३५४(डी) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड
भादंवि ५०६ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व १,००० रुपये दंड
तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गतही विविध कलमांनुसार  १० वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा व दंड ठोठावण्यात आले.
न्यायालयाने सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एकूण २८,५०० रुपयांचा दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

🎯 न्यायालयीन कार्यवाहीत सहभाग
या प्रकरणात  पैरवी अधिकारी पोलीस नाईक सुरेश निब्रड (ब.नं. ३२२), पोलीस स्टेशन शिरपूर यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : दोन ट्रकमधून ४९ गोवंशांची सुटका; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करी उधळली; पोलिसांची धडक कारवाई, १४ बैलांची सुटका, वणी येथील एका आरोपीसह नागपूर, भंडारा येथील 4 जण ताब्यात

पांढरकवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : हरविलेले ४७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत; ३.७५ लाखांचे २५ मोबाईल सुपूर्द

भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साईकृष्णा रंगनेनिवार यांची नियुक्ती

समन्वयातून मार्ग! श्री गोपाळकृष्ण मंदिर विकासासाठी अडथळे दूर, दुकानदारांची जागा खाली करण्यास संमती ; युवा टायगर फोर्सकडून सन्मान

१२ वर्षांपासून बंद असलेल्या विहिरीला नवे जीवन, संजय झोटिंग यांचा पुढाकार; उपजिल्हा रुग्णालयातील पाणीटंचाईवर दिलासादायक उपाय

Leave a Comment