ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

समन्वयातून मार्ग! श्री गोपाळकृष्ण मंदिर विकासासाठी अडथळे दूर, दुकानदारांची जागा खाली करण्यास संमती ; युवा टायगर फोर्सकडून सन्मान

On: March 6, 2026 9:12 AM
Follow Us:
---Advertisement---

मंदिर परिसरात मंगल कार्यालय, वृद्धाश्रम व MPSC-UPSC अभ्यासिकेची उभारणी प्रस्तावित

✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा येथील प्राचीन व सार्वजनिक श्रद्धास्थान असलेल्या श्री गोपाळकृष्ण मंदिर संस्थेच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंदिराच्या मालकीच्या दुकानांबाबत निर्माण झालेला वाद चर्चेच्या माध्यमातून मार्गी लागला असून संबंधित दुकानदारांनी मंदिर विकासाच्या दृष्टीने जागा खाली करण्यास सकारात्मक संमती दर्शवली आहे.

दिनांक ५ मार्च २०२६ रोजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. सुरेश अग्रवाल, श्री. अतुल मायी व श्री. राजेश नार्लावार यांनी मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेत दुकाने रिकामी करण्यास सहमती दर्शवली. संबंधित व्यक्तींच्या अडचणी समजून घेत परस्पर चर्चेतून मार्ग काढण्यात आल्यामुळे हा प्रश्न शांततेत निकाली निघाला.

या सकारात्मक निर्णयानंतर युवा टायगर फोर्सच्या वतीने संबंधित तिन्ही व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी सांगितले की, “मंदिर विकास हा संपूर्ण समाजाचा विषय आहे. यापूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीत आमच्याकडून कोणाची भावना दुखावली गेली असल्यास आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.”

तसेच त्यांनी अतुल मायी, सुरेश अग्रवाल व राजेश नार्लावार यांची समजूत काढून समाजहितासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

बैठकीत मंदिर विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंदिर परिसरातील उपलब्ध जागेवर नवीन सभागृह व मंगल कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून हे मंगल कार्यालय सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
तसेच समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यासाठी देवस्थानच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार ज्येष्ठ नागरिकांना निवासाची सोय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट केले.

याशिवाय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी MPSC व UPSC अभ्यासिका सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला असून लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र वेदपाठक, उपाध्यक्ष संजय चिंतावार, सचिव मधुकर गुडावार, सहसचिव अनिल काळे, कोषाध्यक्ष प्रकाश गावंडे तसेच विश्वस्त  शिशिर  कुलकर्णी डॉ. नारायण  उपलेंचवार श्री. डॉ. संजय तोडासे राहुल  भानेगावकर कृष्णा  देवघरे मंडळातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार, संयोजक अंकित नैताम सुनील बोकीलवार बंडू नक्षणे सुधीर जुवारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संवाद, समन्वय व समाजहिताची भूमिका यामुळे हा प्रश्न शांततेत मार्गी लागल्याने मंदिर विकासासह विविध समाजोपयोगी उपक्रमांना आता गती मिळणार असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment