ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : हरविलेले ४७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत; ३.७५ लाखांचे २५ मोबाईल सुपूर्द

On: March 7, 2026 1:24 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान
सामान्य नागरिकांचे हरविलेले मोबाईल फोन शोधून त्यांना परत देण्याच्या उद्देशाने पांढरकवडा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत आतापर्यंत एकूण ४७ मोबाईल फोन ट्रेस करण्यात यश मिळवले आहे. यापैकी यापूर्वी २२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ धारकांना परत करण्यात आले होते.
दरम्यान, आज दि. ७ मार्च २०२६ रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे आयोजित कार्यक्रमात उर्वरित २५ मोबाईल फोन मालकांना सुपूर्द करण्यात आले. या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
सदर मोबाईल फोन  रॉबिन बन्सल, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा यांच्या हस्ते संबंधित मोबाईल धारकांना परत देण्यात आले. आपले हरविलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पांढरकवडा पोलिसांचे आभार मानले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंथा (यवतमाळ) व अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास व सायबर प्रणालीच्या मदतीने हरविलेले मोबाईल फोन शोधून काढले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, नापोका सचिन काकडे, सुनिल राठोड, संदीप मडावी तसेच पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्यलवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पांढरकवडा पोलिसांनी केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment