ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करी उधळली; पोलिसांची धडक कारवाई, १४ बैलांची सुटका, वणी येथील एका आरोपीसह नागपूर, भंडारा येथील 4 जण ताब्यात

On: March 11, 2026 8:02 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत १४ जिवंत बैलांची सुटका केली. या कारवाईत तीन बैल मृत अवस्थेत आढळून आले असून एक आयशर वाहनासह एकूण १७ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास नागपूरकडून हैदराबादकडे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कोंघारा फाटा राष्ट्रीय महामार्ग ४४ येथे सापळा रचून तपासणी सुरू केली.

दरम्यान नागपूरकडून येणारा आयशर ट्रक (क्र. MH 40 CM 3230) संशयित वाटल्याने पोलिसांनी वाहन थांबवून पाहणी केली. वाहनामध्ये १७ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. बैलांच्या मानेला घट्ट दोऱ्या बांधून तसेच पाय बांधून त्यांना अमानुषरीत्या वाहतूक केली जात होती. त्यापैकी १४ बैल जिवंत तर ३ बैल मृत अवस्थेत आढळले.

🎯 या प्रकरणी पोलिसांनी

🔺1. मोहम्मद रिजवान मोहम्मद रफिक शेख (वय ३२, नागपूर)

🔺2. अब्दुल रफिक अब्दुल कादिर कुरेशी (वय ३०, नागपूर)

🔺3. मोहम्मद जुनेद अब्दुल कादिर (वय ३२, वणी)

🔺4. साहू उर्फ सद्दाम कुरेशी (वय ३४, नागपूर)

🔺5. निखिल डोरले (भंडारा)

यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत जनावरे वाहतूक करण्यासाठी ट्रक ५५ हजार रुपयांमध्ये भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १४ जिवंत बैलांना पांढरकवडा नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून त्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. मृत तीन बैलांचे शवविच्छेदन करून त्यांचे शव पुरण्यात आले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहु तावरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली. या पथकात पोहेकॉ राम राठोड, विलास जाधव, रजनीकांत पाटील, सुनिल राठोड आणि सचिन काकडे यांचा समावेश होता. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : दोन ट्रकमधून ४९ गोवंशांची सुटका; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : हरविलेले ४७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत; ३.७५ लाखांचे २५ मोबाईल सुपूर्द

भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साईकृष्णा रंगनेनिवार यांची नियुक्ती

समन्वयातून मार्ग! श्री गोपाळकृष्ण मंदिर विकासासाठी अडथळे दूर, दुकानदारांची जागा खाली करण्यास संमती ; युवा टायगर फोर्सकडून सन्मान

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वेळाबाई (वणी) येथील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास, केळापूर विशेष न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय; पीडितेला नुकसान भरपाई

१२ वर्षांपासून बंद असलेल्या विहिरीला नवे जीवन, संजय झोटिंग यांचा पुढाकार; उपजिल्हा रुग्णालयातील पाणीटंचाईवर दिलासादायक उपाय

Leave a Comment