ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : दोन ट्रकमधून ४९ गोवंशांची सुटका; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

On: March 11, 2026 4:18 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान

पांढरकवडा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर गोवंश तस्करी करणाऱ्या दोन ट्रकांवर धडक कारवाई करत तब्बल ४९ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत दोन ट्रक, गोवंशीय जनावरे आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पथकाला दि. ११ मार्च २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की नागपूरकडून आदिलाबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून दोन ट्रकमधून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळखुटी येथील बॉर्डर चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली.

सकाळी सुमारे ६.५० वाजता नागपूरकडून येणारा एमएच ४० वाय ३३८२ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्या दहा चाकी ट्रकमध्ये २५ गोवंशीय बैल जातीची जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने दाटीवाटीने कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यापैकी एक बैल मृत अवस्थेत आढळून आला.

यानंतर त्या ट्रकच्या पाठोपाठ येणारा एमएच ४० वाय ७७२१ क्रमांकाचा दुसरा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये २४ गोवंशीय बैल जातीची जनावरे कोंबलेली आढळली. या वाहनातील दोन बैल मृत अवस्थेत सापडले.

🎯 जप्त मुद्देमाल

या कारवाईदरम्यान पोलिसांनी

🔺टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक (एमएच ४० वाय ३३८२) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

🔺टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक (एमएच ४० वाय ७७२१) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

🔺४९ गोवंशीय जनावरे – अंदाजे किंमत १९.६० लाख रुपये

🔺३ अँड्रॉइड मोबाईल – अंदाजे किंमत ४० हजार रुपये

असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

🎯 आरोपींवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे –

🔻1. जहूर खान साहेब खान (वय ३०) रा. कामठी, नागपूर

🔻2. मौसीन कुरेशी मोबीन शेख कुरेशी (वय ३१) रा. आझाद नगर, टेका, नागपूर

🔻3. मो. शहबाज उर्फ सोनू उर्फ मुल्ला मो. नवाब (वय ४०) रा. भाजी मंडी, कामठी, नागपूर

🔻4. मोहम्मद फिरोज (वय ४०) रा. सिव्हिल कॉलनी, नवीन येरवडा, कामठी, नागपूर

त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ४९, प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🎯 पोलिस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहु तावरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या पथकात सपोनि सागर पेंढारकर, पोशि विकेश ध्यावर्तीवार, पोहेका गजानन पत्रे, पोहेका राम राठोड, पोहेका विलास जाधव, नापोका किशोर आडे, नापोका संदीप मडावी व पोका पवन मेश्राम यांनी सहभाग घेतला.

पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करी उधळली; पोलिसांची धडक कारवाई, १४ बैलांची सुटका, वणी येथील एका आरोपीसह नागपूर, भंडारा येथील 4 जण ताब्यात

पांढरकवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : हरविलेले ४७ मोबाईल फोन शोधून मालकांना परत; ३.७५ लाखांचे २५ मोबाईल सुपूर्द

भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साईकृष्णा रंगनेनिवार यांची नियुक्ती

समन्वयातून मार्ग! श्री गोपाळकृष्ण मंदिर विकासासाठी अडथळे दूर, दुकानदारांची जागा खाली करण्यास संमती ; युवा टायगर फोर्सकडून सन्मान

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वेळाबाई (वणी) येथील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास, केळापूर विशेष न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय; पीडितेला नुकसान भरपाई

१२ वर्षांपासून बंद असलेल्या विहिरीला नवे जीवन, संजय झोटिंग यांचा पुढाकार; उपजिल्हा रुग्णालयातील पाणीटंचाईवर दिलासादायक उपाय

Leave a Comment