ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात गॅससाठी हजारोंची रांग – नागरिक त्रस्त, प्रेरणा गॅस एजन्सी समोर तासन्‌तास उभे नागरिक; पाणी-सावलीचीही व्यवस्था नाही

On: March 14, 2026 8:58 AM
Follow Us:
---Advertisement---

घरपोच गॅस पुरवठा सुरू करा – युवा टायगर फोर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

✍️पांढरकवडा : अशफाक खान

पांढरकवडा शहरात घरगुती एलपीजी गॅस वितरणाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील प्रेरणा गॅस एजन्सी येथे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून हजारो नागरिकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. चार-चार तास नागरिकांना उन्हात उभे राहावे लागत असून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सावलीची किंवा कोणत्याही मूलभूत सुविधेची व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना तीन-तीन दिवस बुकिंग करूनही घरपोच गॅस मिळत नसल्याने लोकांना सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीवर धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे शहरात गॅस वितरण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर युवा टायगर फोर्स, पांढरकवडा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये म्हणून घरपोच गॅस वितरण व्यवस्था तातडीने सुरू करावी, तसेच वितरण केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

युवा टायगर फोर्सने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, गॅस वितरणात सुरू असलेली ही अव्यवस्था तात्काळ थांबवली नाही तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन व गॅस एजन्सीवर राहील.

🎯 “नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका”

युवा टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
“गॅससाठी चार-चार तास उन्हात उभे राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून घरपोच गॅस वितरण सुरू करावे व एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करावी.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment