ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पाटणबोरीत वरली मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; दोन जण ताब्यात, रोख रक्कम जप्त

On: March 14, 2026 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा:  अशफाक खान


अवैध जुगार धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान पाटणबोरी येथे वरली मटका जुगार खेळविणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ ते ४.०० वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पांढरकवडा येथील पोलीस पथकाने पाटणबोरी येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घातली होती. यावेळी अशोका बारसमोर एक इसम लोकांकडून पैसे स्वीकारून जवळील कागदावर वरली मटका जुगाराचे १ ते १० अंक लिहून हार-जीतचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावरून पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे किशोर शंकर मिरकुलवार (वय ४२, रा. मांडवी बोरी, ता. झरी, जि. यवतमाळ) आणि मोनु ठाकुर (वय अंदाजे ४०, रा. पाटणबोरी ता. केळापूर) अशी सांगितली.

पंचासमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान आरोपी किशोर मिरकुलवार याच्या ताब्यातून वरली मटका जुगाराचे १ ते १० अंक लिहिलेला बुकचा कार्बन तुकडा, एक पेन तसेच रोख ५,७१० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी आरोपी किशोर शंकर मिरकुलवार व मोनु ठाकुर यांच्याविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच कलम ४९ बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस हवालदार संजय अभ्यंकर, इमरान खान, महेश नाईक व शरद शिवणकर यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर धाक निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment